सचिन बनसोडे
शिर्डी (अहमदनगर) : शिर्डीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला काकडी ग्रामपंचायतीकडून मालमत्ता कर थकविल्यापोटी जप्तीची नोटीस बजाविण्यात आली आहे. सदरचा मालमत्ता कराची थकीत रक्कम भरण्यासाठी पाच दिवसांची मुदत देण्यात आली असून या कालावधीत रक्कम न भरल्यास विमानतळाची मालमत्ता जप्त करण्याचा इशारा दिला आहे.
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शिर्डीच्या जवळ असलेल्या काकडी ग्रामपंचायत हद्दीत हे विमानतळ उभारण्यात आले आहे. या विमानतळावरून रोजच उड्डाण होत असतात. दरम्यान विमानतळाची उभारणी करताना गावातील हजारो हेक्टर जमिनीचे भुसंपादन करण्यात आले होते. हे भूसंपादन करताना काकडी गावात पायाभुत सुविधा आणि ग्रामविकासाठी निधी देण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरणाने दिले होते. (Shirdi Airport) मात्र कोणत्याही आश्वसनांची पुर्तता झाली नाही.
८ कोटी ३० लाख थकविले
इतकेच नाही तर (Gram Panchayat) ग्रामपंचायतीला देण्यात येणाऱ्या ८ कोटी ३० लाखांचा कर देखील विमानतळ प्राधिकरणाने थकवला आहे. सदरचा कर थकल्याने गावातील विकासाला अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत विमानतळ प्राधिकरण, मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा करूनही कराची रक्कम जमा होत नसल्याने अखेर ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस पाठविली आहे. विमातळाची टर्मिनल बिल्डिंग, पेट्रोल पंप, एटीसी टॉवरसह मालमत्ता जप्तीचे वॉरंट ग्रामपंचायतीने बजावले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.