Buldhana News : अतिवृष्टी मदतीत कोट्यावधीचा घोटाळा; दोन तलाठीसह एक संगणक ऑपरेटरवर गुन्हा दाखल

Buldhana News : मागील वर्षी जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे असंख्य शेतकऱ्याच्या शेती पिकासह खरडून गेली होती.
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. याचे पंचनामे झाल्यानंतर शासनाकडून मदत निधी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त यादीनुसार नुकसानग्रस्तांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. मात्र यात तलाठ्यांनी शेती नसलेल्यांची नावे देत निधीत घोटाळा केला होता. यात दोषी आढळलेल्या दोन तलाठी व एका संगणक ऑपरेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Buldhana News
Nandurbar Rain : नंदुरबार शहरासह परिसरात जोरदार पाऊस; तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात

मागील वर्षी जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे असंख्य (Farmer) शेतकऱ्याच्या शेती पिकासह खरडून गेली होती. तसेच असंख्य घरांची पडझड झाली होती. प्रशासनाच्या वतीने तातडीने पंचनामे करण्यात येऊन शासन दरबारीं अहवाल सादर करण्यात आला होता. (Buldhana) त्यानुसार कोट्यावधीचा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आला. मात्र जळगाव जामोद तहसीलदार यांना या शेतकऱ्यांच्या यादीत काहीतरी घोळ झाला असल्याचे लक्षात आले. यानुसार त्यांनी एक समिती नेमून चौकशी केली असता त्यांच्या असे लक्षात आले की, ज्यांच्याकडे शेतीच नाही अश्याच्या खात्यात लाखो रुपये जमा करण्यात आले आहे. 

Buldhana News
Bus Accident : मोठा अनर्थ टळला; वेरूळ घाटामध्ये बसचा भीषण अपघात, ४० प्रवासी थोडक्यात बचावले

१ कोटी ८७ लाखाची केली वसुली 

यादी तयार करून अश्या बोगस शेतकऱ्यांची सुनावणी घेऊन त्यांच्याकडून वसुली केली. तसेच यात दोषी असलेले दोन तलाठी व एक संगणक ऑपरेटरवर जळगाव जामोद पोलिसात तक्रार देऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तहसीलदार शीतल सोलत यांच्या तत्परतेमुळे हे प्रकरण समोर आले व त्यांनी शास्नाच्या तिजोरीत पुन्हा एक कोटी ८७ लाख रुपये परत वसुली करून जमा केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com