सागर निकवाडे
नंदुरबार : मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आज पुन्हा नंदुरबार शहरासह परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली होती.
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यासह परिसरात मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाला. पावसाची संततधार सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. शिवाय शेतीची कामे देखील थांबली होती. मात्र मागील तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. तीन दिवसांपासून पाऊस (Rain) नाल्याने शेतीच्या कामांना देखील वेग आला होता. शेतातील रखडलेली कामे पूर्ण करण्याची लगबग सुरु झाली होती. दरम्यान आज पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.
आज दुपारच्या सुमारास आलेल्या (Heavy Rain) जोरदार पावसामुळे नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे. मागील आठड्यात झालेल्या पावसामुळे सद्य स्थितीत विरचक धरणात पस्तीस टक्के पाणीसाठा झाला आहे. परंतु धारण भरण्यासाठी आणखी दमदार अशा पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.