सागर निकवाडे
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील मांडवी ग्रामपंचायतीची ग्रामसभा बोलावण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये वाद होऊन हाणामारीपर्यंत प्रकरण गेले. यात सरपंचाच्या जेठाने ग्रामपंचायत सदस्य वालसिंग राहसे यांना कानशिलात लगावली. यामुळे वाद अधिकच वाढला होता. दरम्यान अन्य सदस्यांनी मध्यस्थी करत वाद मिटविला.
ग्रामसभा (Gram Sabha) म्हटली म्हणजे कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून सभेत वाद होत असतो. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील मांडवी या ग्रामपंचायतीची (Gram Panchayat) ग्रामसभा बोलाविण्यात आली होती. सभेत सदस्यांनी विषय मांडत ग्रामपंचायत सरपंच आणि त्यांचे परिवार मनमानी पद्धतीने काम करत असून ग्रामसभेच्या संदर्भात विरोधात असलेल्या सदस्यांना कुठल्याही प्रकारे पूर्वकल्पना न देता परस्पर आपल्या घरी ग्रामसभा का घेतात; अशी विचारणा केली. या वरून वादाला सुरवात झाली.
सदस्याने विचारले असता सरपंच मिनाबाई रासे यांच्या जेठाने ग्रामपंचायत सदस्याला मारले. अनेकदा ग्रामसभा किंवा विकास काम करत असताना सदस्यांना कधीही विश्वासात घेत नाही. वारंवार ग्रामसेवकाकडे तक्रारी केल्या. मात्र ग्रामसेवक दुर्लक्ष करत असतात. ग्रामपंचायतमध्ये देवाण- घेवाण आणि मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याचा आरोप देखील सदस्यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.