Bangladesh Violence : बांगलादेशात लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, वाहनांच्या तोडफोडीत १५ जखमी; शेख हसीना यांचे समर्थक आक्रमक

Sheikh Hasina Supporter Awami League Protesters Attack On Army Vehicle: बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे समर्थक आक्रमक झाल्याचं समोर आलंय. त्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केलाय.
बांगलादेशात लष्कराच्या ताफ्यावर हल्ला
Bangladesh Violence Saam Tv
Published On

मुंबई : बांगलादेशमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेला हिंसाचार आता नियंत्रणाबाहेर गेलाय. बांगलादेशात सध्या सरकार, जनता, लष्कर कोणीही सुरक्षित नसल्याचं दिसतंय. आता पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. लष्कराच्या जवानांवरही हल्ला झाल्याची माहिती बांगलादेशातील स्थानिक वृत्तपत्राच्या हवाल्यानुसार मिळतेय. गोपालगंज भागात लष्कराच्या वाहनावर हल्ला झाल्याचं समोर आलंय.

बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार

बांगलादेशात शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या समर्थनार्थ आता अवामी लीगचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. शनिवारी (१० ऑगस्ट) संध्याकाळी चारच्या सुमारास ही घटना घडलीय. अवामी लीगचे हजारो कार्यकर्ते माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या परतीची मागणी करत आहेत. त्यांनी ढाका-खुलना महामार्ग रोखून धरला होता. लष्कराच्या जवानांनी त्यांना रोखले असता जमावाने त्यांच्यावर दगड विटांनी हल्ला (Bangladesh Violence) केलाय. यानंतर लष्करानेही गोळीबार केल्याची माहिती मिळतेय. या हल्ल्यामध्ये लष्कराचे कर्मचारी, पत्रकार आणि स्थानिक लोकांसह १५ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

शेख हसीना यांच्या परतीची मागणी

आंदोलनस्थळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली होती. त्यामुळे आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी लष्कराच्या जवानांनी लाठीमार केला. यावेळी आंदोलकांनी देखील आक्रमक पवित्रा घेत लष्कराच्या वाहनांची तोडफोड (Awami League Protesters Attack On Army) केलीय. गोपालगंज कॅम्पचे लेफ्टनंट कर्नल मकसूदुर रहमान यांनी या घटनेची माहिती दिलीय. त्यांनी आज तकला दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ३ ते ४ हजार लोकांनी रस्ता अडवला होता. गोपीनाथपूर संघाचे माजी अध्यक्ष लच्छू शरीफ यांनी सांगितलं की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराच्या जवानांनी गोळीबार केला होता. यामध्ये मुलासह दोन जणांना गोळ्या लागल्या होत्या. या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचं समोर येतंय.

बांगलादेशात लष्कराच्या ताफ्यावर हल्ला
Bangladesh News: साडी ब्लाऊज, खुर्ची अन्... भांडे; आंदोलकांनी शेख हसीना यांच्या घरातून काय काय पळवलं? बघा VIDEO

भारत - बांगलादेश सीमेवर अलर्ट

बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता पसरली आहे. त्यामुळे भारत प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलंय. त्यामुळे भारत बांगलादेश सीमेवर अलर्ट ठेवण्यात येत आहे. कोणीही अवैधरित्या राज्यात प्रवेश करू (Bangladesh News) नये, यासाठी आसाम पोलीस भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट मोडवर आहेत. बांगलादेशातून कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश दिला जाणार नाही, अशा सूचना केंद्राने दिल्या असल्याची माहिती पोलीस महासंचालक जी.पी. सिंग यांनी दिलीय. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतर बांगलादेशमधील ५३ जिल्ह्यांमध्ये हल्ले झाले असल्याची माहिती मिळत आहे.

बांगलादेशात लष्कराच्या ताफ्यावर हल्ला
Sheikh Hasina: टीव्ही, पंखेही सोडले नाही, आंदोलकांनी शेख हसीना यांच्या घरातून काय काय लुटलं? पाहा PHOTO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com