Badlpaur Protest : बदलापूर रेल्वे स्थानकात ६ तासांपासून रेलरोको, मध्य रेल्वेच्या लोकल अंबरनाथपर्यंतच धावणार

Kalyan To Karjat Local Services Closed : बदलापूर रेल्वे स्थानकावर नागरिकांनी सकाळपासून ठिय्या आंदोलन केले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. अंबरनाथ ते कर्जत लोकलसेवा बंद झाली आहे.
Badlpaur Protest : बदलापूर रेल्वे स्थानकात ६ तासांपासून रेलरोको, मध्य रेल्वेच्या लोकल अंबरनाथपर्यंतच धावणार
Kalyan To Karjat Local Services Closed Saam Tv
Published On

बदलापुरमधील नामांकित शाळेमध्ये शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ बदलापुरमध्ये बंदची हाक देत नागरिकांनी आंदोलन केले. बदलापूर रेल्वे स्थानकावर नागरिकांनी सकाळपासून ठिय्या आंदोलन केले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. सकाळपासून अंबरनाथ ते कर्जत लोकलसेवा बंद आहे. अंबरनाथच्या पुढे एकही लोकल जात नाही त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. सर्वच रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या रेलरोको आंदोलनामुळे लोकलसेवा पूर्णत: कोलमडली आहे. गेल्या ६ तासांपासून रेलरोको आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सकाळपासून अंबरनाथ ते कर्जत लोकलसेवा बंद आहे. अंबरनाथवरून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत. अंबरनाथवरून सर्व लोकल सीएसएमटीच्या दिशेने परत येत आहेत. त्यामुळे कर्जतच्या दिशेने ज्या नागरिकांना जायचे आहे त्यांची कल्याण आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली आहे.

कर्जत ते कल्याणदरम्यान राहणारे नागरिक मोठ्या संख्येने मुंबईमध्ये नोकरीनिमित्त येतात. सकाळी हे सर्वजण ऑफिसला गेले खरे पण आता बदलापूरमध्ये सुरू असलेल्या रेलरोको आंदोलनामुळे त्यांना अंबरनाथपर्यंत येण्यासाठी लोकल आहेत. पण अंबरनाथवरून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल बंद असल्यामुळे या प्रवाशांचे हाल होत आहेत. अंबरनाथ ते कर्जत लोकलसेवा बंद असल्यामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली आहे. नागरिकांना त्याठिकाणावरून पर्यायी वाहनांनी आपल्या घरी जावे लागल आहेत. पण त्याठिकाणावरून घरी कसे जायचे असा प्रश्न या नागरिकांना पडला आहे.

दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून देखील आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली जात आहे. आंदोलनकर्त्यांची समजूत काढली जात आहे. पण जोपर्यंत आरोपीवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.

Badlpaur Protest : बदलापूर रेल्वे स्थानकात ६ तासांपासून रेलरोको, मध्य रेल्वेच्या लोकल अंबरनाथपर्यंतच धावणार
Badlapur News : बदलापूर अत्याचार प्रकरण ; राजकीय नेते काय म्हणतात? वाचा एका क्लिकवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com