बदलापूर : बदलापुरातील नामांकित शाळेत चिमुकल्या मुलींवरील अत्याचारानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या विरोधात संतप्त नागरिकांनी शाळेच्या समोर जमत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर या संतप्त जमाव बदलापूर रेल्वे स्टेशनजवळ पोहोचला. त्यानंतर हे संतप्त नागरिक बदलापूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ क्रमांकाच्या रेल्वे रुळावर उतरले. रेल्वे थांबवण्यासाठी संतप्त आंदोलकांनी रेल्वे रुळावर उतरले आहेत. शेकडो नागरिक रेल्वे रुळावर उतरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे.
बदलापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचारानंतर आंदोलकांनी संतप्त भूमिका घेतली आहे. बदलापुरातील आंदोलक थेट रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फासावर लटकवण्याची मागणी केली जात आहे. या घटनेच्या विरोधात महिलांकडून संताप व्यक्त करण्यात येणार आहे. या आंदोलनात महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलक ट्रॅकवर उतरल्याने कल्याणहून कर्जतकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
एका आंदोलककर्त्या महिलेचं म्हणणं आहे की, 'आज महिला सुरक्षित नाहीत. वाईट कृत्य करणाऱ्या आरोपीला फाशी मिळाली पाहिजे. असे प्रकार पुन्हा घडायला नको. या आरोपीला शाळेच्या गेटसमोर फाशी दिली पाहिजे. अशा तीव्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
दुसऱ्या आंदोलक महिलेचं म्हणणं आहे की, 'सैनिक सीमेवर प्राणाची आहुती देतात. तर देशात अशा आरोपींना फाशी देण्यात काय अडचण आहे. आठ दिवसानंतर आरोपी सुटतो. त्यामुळे गुन्हे असेच घडतात. त्यामुळे आरोपीला फाशी दिली जात नाही, तोपर्यंत या प्रकाराला आळा बसणार नाही'.
'महाराष्ट्र बंद केल्यावर बदलापूरची घटना सर्वांसमोर पोहोचणार नाही. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, बदलापूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. ठण्यातून कल्याणला जाणाऱ्या लोकल सेवेला बसला आहे. ठाण्यातून १५ मिनिटे उशिराने कल्यानच्या दिशेने रेल्वे धावत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.