Viral Video: जयपूरमध्ये पेट्रोलपंप कर्मचाऱ्याकडून रशियन महिलेशी गैरवर्तन; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Rajasthan Viral Video: भारतीय संस्कृती सर्वात अनोखी संस्कृती म्हणून ओळखली जाते. भारतातील प्रत्येक भागात वेगळेपणा आहे. जिथे राजस्थानमध्ये पर्यटनासाठी आलेल्या रशियन तरूणीसोबत गैरवर्तनाचा प्रकार समोर आला आहे.
Viral Video
Viral VideoSaam Digital
Published On

Jaipur Viral Video

भारतीय संस्कृती सर्वात अनोखी संस्कृती म्हणून ओळखली जाते. भारतातील प्रत्येक भागात वेगळेपणा आहे. याची ख्याती भारताबाहेर गेलेली आहे, ज्यामुळे अन्य देशातील पर्यटक भारतात येत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून विदेशी पर्यटकांसोबत गैरवर्तन होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. अशातच राजस्थानच्या जयपूरमधून एक घटना समोर आली आहे, जिथे राजस्थानमध्ये पर्यटनासाठी आलेल्या रशियन तरूणीसोबत गैरवर्तनाचा प्रकार समोर आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतासह अन्य देशात जयपूरला ' पिंक सिटी 'अशी ओळख आहे. येथे जगभरातील लोक दरदिवशी भेट देत असतात.तसचं काही दिवसांपूर्वी रशियामधील एक तरूणी जयपूरला तिच्या भारतातील मित्रासह भेट देण्यास आलीदरम्यान ते तेथील पेट्रोल पंपावर गेले असता तेथील एका कर्मचाऱ्याने रशियन तरूणीला गैरवर्तन केले.

आपल्यासोबत चुकीचे वर्तन होत असल्याचे तरूणीच्या तसेच तिच्या मित्राच्या लक्षात येताच त्याच्या मोबाईलमध्ये सर्व प्रकार कैद केला. तसेच तिच्या मित्राने पेट्रोल पंपावरील इतर कर्मचाऱ्यांसह मॅनेजरला कॉल करून बोलावून घेतले आणि चुकीचे वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्याला माफी मागण्यास सांगितली. तसेच पोलिसांनी या कर्मचाऱ्याला ताकादी दिली आहे. व्हिक्टोरियाने त्या कर्मचाऱ्याविरूद्ध तक्रार दाखल करण्यास नकार दिला .

रशियन महिलेचा मित्र दिल्लीत राहत असून एक यूट्यूब ब्लॉगर आहे. तिच्या मित्राने त्यांच्या एक्स (ट्वीटर)वरील@onroadindian या अकाऊंटवरून व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसेत त्याने त्याच्या यूट्यूबवरही व्हिडिओ पोस्ट केला आहे.जयपूरमधील व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक नेटकऱ्यांकडून कर्मचाऱ्याविरूद्ध संताप व्यक्त होत आहे. व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com