Badlapur Accident: बदलापुरात आणखी एक धक्कादायक घटना; दोन कारचा भीषण अपघात, गाड्यांचा चक्काचूर Video Viral

Badlapur Accident: बदलापुरात आणखी एक धक्कादायक घटना; दोन कारचा भीषण अपघात, गाड्यांचा चक्काचूर Video Viral

Badlapur Accident : दोन अलिशान कारचा अपघात झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडलीय. हा हिट अँड रनचा प्रकार असल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय.
Published on

बदलापूर अंबरनाथ रोडवर एक धक्कादायक घटना घडलीय. एका कार चालकाने चार ते पाच जणांना चिडरल्याची घटना घडलीय. संध्याकाळी पाच ते साडेपाच दरम्यान झाली घटना घडलीय.

हाती आलेल्या माहितीनुसार, हा अपघात बदलापूरन डी मार्टमागे घडल्याचं सांगितलं जात आहे. हा अपघात जाणूनबुजून करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दोन्ही अलिशान कारमधील व्यक्ती नातेवाईक असल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, काळ्या रंगाची कारने पांढऱ्या रंगाच्या कारमधील एका व्यक्तीला धडक दिली. त्यानंतर पुढे जाऊन यु टर्न घेतल्यानंतर परत काळ्या रंगाच्या कारने पांढऱ्या रंगाच्या कारला समोरून धडक दिली.

त्यानंतर पुढे जाऊन यु टर्न घेतल्यानंतर परत काळ्या रंगाच्या कारने पांढऱ्या रंगाच्या कारला समोरून धडक दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये काळ्या रंग असलेल्या कारचा ड्रायव्हर प्रथम एका व्यक्तीला पांढऱ्या कारमधून उतरलेल्या व्यक्तीला धडक देतो. त्यानंतर खेचून घेऊन जातो.

काही अंतर त्या व्यक्तीला ओढत नेल्यानंतर काळ्या रंगाची कार परत पांढऱ्या रंगाच्या कारकडे येते आणि जोरात समोरून धडक देते. धडक दिलेल्या कारमध्ये महिला आणि लहान मुले बसलेली दिसत आहे. कारला जोरात धडक दिल्यानंतर कार मागे ढकल्या गेली. त्यामुळे पांढऱ्या कार मागे उभ्या दोन दुचाकी चालक चिरडले गेलेत. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

या अपघातात महिला आणि लहान मुले जखमी झालेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केलाय. ही घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास अंबरनाथ-जांभूळ फाट्याजवळ घडली. असल्याची माहिती काहींनी दिली तर काहींना ही घटना संध्याकाळी घडल्याची माहिती दिली. मात्र या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एसयूव्ही कार चालकाने चार ते पाच जणांना कसे चिरडण्याचा प्रयत्न केला ते दिसत आहे. सुदैवाने केवळ लोक जखमी झाले आणि कोणालाही जीव गमवावा लागला नाहीये.

Badlapur Accident: बदलापुरात आणखी एक धक्कादायक घटना; दोन कारचा भीषण अपघात, गाड्यांचा चक्काचूर Video Viral
Nashik Accident : कसारा घाटात भीषण अपघात; वाहन थेट खोल दरीत कोसळलं, ५ जणांचा मृत्यू | VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com