मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. बागेश्वर धामच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या रिक्षाने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत ५ भाविकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
मृतांमध्ये महिला तसेच लहान मुलांचा समावेश आहे. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून (Police) ओळख पटवणे सुरू आहे. अपघातात ७ हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त लोक बागेश्वर धामच्या दर्शनसाठी जात होते. मंगळवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ते छतरपूर रेल्वेस्थानकावर (Railway Station) उतरले. तेथून त्यांनी बागेश्वरधामकडे जाण्यासाठी रिक्षा मागवली.
या रिक्षात तब्बल १२ जण बसले. झाशी खजुराहो महामार्ग NH 39 वर रिक्षा आली असता, रिक्षाचालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच रिक्षाने समोरून जात असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली.
अपघात इतका भीषण होता, की संपूर्ण रिक्षाचा चक्काचूर झाला. या घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाने रुग्णालयात जीव सोडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. स्थानिकांनीही पोलिसांना मोठी मदत केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.