Gujarat News Saam Tv
देश विदेश

Shocking: मंदिराच्या बाथरूममध्ये आढळले २ तरुणींचे मृतदेह, मोबाइलमधून धक्कादायक माहिती उघड; नेमकं काय घडलं?

Bodies Of Two Students Found In Temple Washroom: दोन तरुणींचा मृतदेह मंदिराच्या बाथरूममध्ये आढळून आल्यामुळे गुजरातमध्ये खळबळ उडाली. या मुली कॉलेजमधून बेपत्ता झाल्या होत्या.

Priya More

Summary -

  • गुजरातमध्ये मंदिराच्या बाथरूममध्ये दोन विद्यार्थिनींचे मृतदेह सापडले

  • दोन्ही तरुणींचे वय अंदाजे १८ ते २० वर्षे होते

  • घटनास्थळी भूल देण्यासाठी वापरले जाणारे इंजेक्शन सापडले

  • दोन्ही तरुणी कॉलेजमधून बेपत्ता झाल्या होत्या

मंदिरामध्ये दोन विद्यार्थिंचे मृतदेह सापडल्याची घटना गुजरातमध्ये घडली. गुजरातच्या सूरत शहरामध्ये ही घटना घडली. स्वामीनारायण मंदिराच्या बाथरूममध्ये कॉलेजच्या दोन विद्यार्थिनींचे मृतदेह आढळून आले. या दोन्ही मुलीचे वय अंदाजे १८ ते २० वर्षे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरुणींचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी दोन्ही तरुणांचे मोबाइल जप्त केले असून ते पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे सूरत शहरामध्ये खळबळ उडाली.

पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी भूल देण्यासाठी वापरले जाणारे इंजेक्शन सापडले आहेत. मृत्यूपूर्वी दोन्ही मुलींनी चॅटजीपीटीवर वापर करून आत्महत्या कशी करावी याबद्दल शोध घेतला होता. सहाय्यक पोलिस आयुक्त एन.पी. गोहिल यांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारपासून दोन्ही विद्यार्थिनी बेपत्ता होत्या आणि त्याच रात्री सानिया गावातील स्वामीनारायण मंदिराच्या बाथरूममध्ये दोघींचे मृतदेह आढळून आले. दोघींच्या कुटुंबियांनी दिंडोली पोलिस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांचे फोन चालू होते पण दोघांपैकी कुणीही फोन उचलत नव्हते. त्यांच्या फोन लोकेशनचा शोध घेतल्यानंतर पोलिसांचे एक पथक सानिया गावात गेले आणि त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांना त्यांची स्कूटर एका मंदिराजवळ सापडली.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही मुली मंदिरातील बाथरूमकडे जाताना दिसल्या. बाथरूमचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडला तर आतमध्ये दोघीही बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. एका मुलीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि दुसरीला स्माइमर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दोन्ही रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी पुढे सांगितले की, बाथरूमची तपासणी केली असता त्याठिकाणी भूल देण्यासाठी वापरले जाणारे इंजेक्शन सापडले. तर एका पीडितेच्या फोनच्या गॅलरीत आत्महत्येशी संबंधित काही फोटो सापडले. पोलिसांनी सांगितले की दोघी तरुणी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होत्या. दोघीही शाळेत असल्यापासून खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IDBI Recruitment: आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी; १३०० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : राज ठाकरे रायगडावर दाखल

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात १९६०० रुपयांची घसरण; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Bigg Boss Marathi 6 : रुचिता गेल्यावर विशालचा नवा गेम प्लान; थेट संपूर्ण घराशी घेतला पंगा, अखेर राखीने वैतागून केली 'ही' गोष्ट

Raj Thackeray : तुमची जात, तुमचा धर्म यापेक्षा... राज ठाकरेंची खास पोस्ट, तरूणांना आवाहन करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT