अंधेरी पूर्वेत भर रस्त्यात पत्नीची चाकूने हत्या
घरगुती वादातून घडली घटना
सीसीटीव्ही फुटेज समोर
एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली
Mumbai Andheri Murder News मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी पूर्व येथे शुक्रवारी संध्याकाळी ४६ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची भर रस्त्यात चाकूने वार करून हत्या केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तसेच नागरिक देखील भयभीत झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, , सदर घटना २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता अंधेरी पूर्वेकडील सागबाग रोडवरील आराध्या रुग्णालयासमोर घडली. राजेश एकनाथ छत्रे (वय ४६) असे आरोपीचे नाव आहे. राजेशने घरगुती वादातून त्याची पत्नी पंचभिला राजेश छत्रे (वय ३८) हिच्यावर भर रस्त्यात चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पंचभिला या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार राहिल रियाज लोखंडे (२७) हा ऑटो-रिक्षा चालक आणि पवई येथील रहिवासी आहे. त्याने ही घटना पाहिली आणि नंतर तक्रार दाखल केली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे. शवविच्छेदन प्रक्रियेदरम्यान, मृताचे कपडे आणि घटनास्थळावरील इतर नमुने पुरावा म्हणून ताब्यात घेण्यात आले. अटकेच्या वेळी आरोपीने घातलेले कपडे , गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम ३७(१)(अ) आणि १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला. २८ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३२ वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला. १ मार्च रोजी मध्यरात्री १२.०९ वाजता आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.