Health Tips : भात खाल्ल्यानंतर लगेच झोप येतेय? शरीरात नक्की काय घडतं, जाणून घ्या

post meal tiredness : दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यानंतर लगेचच डुलकी लागणे किंवा आळस येणे ही शारीरिक प्रक्रिया होत. वैद्यकीय भाषेमध्ये या प्रक्रियेला 'पोस्टप्रॅन्डियल सोम्नोलन्स'किंवा 'फूड कोमा' म्हटले जाते.
Scientific reasons behind feeling tired after a rice lunch
Scientific reasons behind feeling tired after a rice lunchsaam tv
Published On: 

दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यानंतर अनेकांना अचानक सुस्ती जाणवू लागते. डोळ्यांवर झोप येते, शरीर थकल्यासारखे वाटते आणि काही वेळ आराम करावा असे वाटते. विशेष म्हणजे, पोळी खाल्ल्यानंतर जेवढी झोप येत नाही, त्यापेक्षा भात खाल्ल्यानंतर अधिक सुस्ती जाणवते, असा अनेकांचा अनुभव आहे. पण असे नेमके का होते? यामागे केवळ पोट भरल्याचे कारण नसून रक्तातील साखरेची पातळी, इन्सुलिन आणि शरीरातील काही हार्मोन्स यांचाही संबंध आहे. जाणून घेऊया यामागील वैज्ञानिक कारणे.

भातामुळे रक्तातील साखर वाढते

भातामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. विशेषतः पांढरा भात लवकर पचतो आणि त्याचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढते. ही पातळी नियंत्रित करण्यासाठी स्वादुपिंडातून इन्सुलिन हार्मोन स्रवते. रक्तातील साखरेच्या पातळीत होणाऱ्या बदलांमुळे काही लोकांना थकवा आणि सुस्ती जाणवू शकते.

Scientific reasons behind feeling tired after a rice lunch
Health Tips : हिवाळ्यात कोणतीही लक्षणे नसतानाही रक्तदाब का वाढतो? तज्ज्ञांनी सांगितली ही कारणे

झोपेशी संबंधित हार्मोन्सचा असतो संबंध

भात खाल्ल्यानंतर झोप येण्यामागे ट्रिप्टोफॅन या अमिनो अॅसिडचाही संबंध असतो. इन्सुलिनच्या वाढीमुळे ट्रिप्टोफॅनला मेंदूपर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते. ट्रिप्टोफॅनपासून सेरोटोनिन तयार होते. पुढे सेरोटोनिनपासून मेलाटोनिन तयार होण्यास मदत होते. मेलाटोनिन हे झोपेचे नियमन करणारे हार्मोन आहे. त्यामुळे जेवणानंतर आराम किंवा झोप येउ शकते.

दुपारच्या वेळी शरीराला नैसर्गिकरीत्या सुस्ती येते

केवळ भात खाल्ल्यामुळेच झोप येते असे नाही. आपल्या शरीराच्या जैविक घड्याळानुसार दुपारच्या वेळेत नैसर्गिकरीत्या सुस्ती जाणवू शकते. त्यामुळे दुपारचे जेवण केल्यानंतर झोप अधिक जाणवते.

Scientific reasons behind feeling tired after a rice lunch
Kitchen Tips : आले-लसूण पेस्ट लवकर खराब होतेय? जास्त दिवस टिकवण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

भात खाल्ल्यानंतर येणारी सुस्ती कशी टाळाल?

  • एकाच वेळी जास्त भात खाणे टाळा.

  • भातासोबत डाळ, दही किंवा पनीरसारखे प्रथिनयुक्त पदार्थ खा.

  • जेवणात हिरव्या भाज्या आणि सलाडचा समावेश करा.

  • पांढऱ्या भाताऐवजी अधूनमधून ब्राऊन राइस खा.

  • ज्वारी आणि बाजरीसारख्या तंतुमय धान्यांचाही आहारात समावेश करा.

  • जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी थोडे चालावे.

  • वारंवार सुस्ती येत असल्यास दुर्लक्ष करू नका

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर अन्नाचा परिणाम वेगवेगळा होतो. भाताचे प्रमाण, तो शिजवण्याची पद्धत आणि त्यासोबत खाल्ले जाणारे पदार्थ यावरही सुस्ती अवलंबून असते. मात्र, प्रत्येक वेळी जेवणानंतर खूप थकवा किंवा झोप येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप : ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. सतत थकवा किंवा जेवणानंतर अतिप्रमाणात झोप येत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.