Health Tips : हिवाळ्यात कोणतीही लक्षणे नसतानाही रक्तदाब का वाढतो? तज्ज्ञांनी सांगितली ही कारणे

Cold weather and hypertension : हिवाळ्यात तापमानातील बदलांमुळे रक्तदाब वाढण्याचा धोका असतो, ज्याची कोणतीही लक्षणे सहसा जाणवत नाहीत. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
how cold weather affects blood pressure levels and heart health
how cold weather affects blood pressure levels and heart healthSAAM TV
Published On: 

हिवाळा सुरू झाला की वातावरणातील तापमानात घट होते. याचा परिणाम केवळ त्वचा, केस किंवा श्वसनसंस्थेवरच होत नाही, तर हृदयाच्या आरोग्यावरही होतो. विशेष म्हणजे, थंडीच्या दिवसांत काही लोकांचा रक्तदाब वाढू शकतो. धक्कादायक बाब म्हणजे रक्तदाब वाढलेला असतानाही अनेकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे आपला रक्तदाब सामान्य आहे, असे समजून अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात.

तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये काही नैसर्गिक बदल होतात. यामुळे रक्तप्रवाहाला अधिक प्रतिकार निर्माण होतो आणि रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. विशेषतः आधीपासून उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीचे आजार किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया हिवाळ्यात रक्तदाब वाढण्यामागील कारणे आणि घ्यायची काळजी.

how cold weather affects blood pressure levels and heart health
Kitchen Tips : आले-लसूण पेस्ट लवकर खराब होतेय? जास्त दिवस टिकवण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

थंडीत रक्तदाब का वाढतो?

रक्तवाहिन्या आकुंचन पावतात

थंडीमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तप्रवाहाला अधिक प्रतिकार निर्माण होतो आणि रक्तदाब वाढू शकतो.

व्यायाम कमी प्रमाणात करणे

थंडीमुळे सकाळी फिरायला जाणे किंवा व्यायाम करणे अनेकजण टाळतात. शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे वजन वाढण्यासह रक्तदाबावरही परिणाम होऊ शकतो.

मिठाचे अतिप्रमाणात सेवन

हिवाळ्यात भजी, फरसाण, लोणचे आणि पॅकेज्ड पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते. यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात पाणी साठते आणि रक्तदाब वाढू शकतो.

झोपेच्या सवयींमध्ये बदल

हिवाळ्यात दिवस लहान असल्याने दिनचर्या आणि झोपेच्या वेळेत बदल होतो. अपुरी झोप आणि अनियमित दिनचर्येचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

मद्यपान आणि पाणी कमी पिणे

काहीजण हिवाळ्यात मद्यपानाचे प्रमाण वाढवतात. तसेच तहान कमी लागल्यामुळे पाणीही कमी पितात. या सवयी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

how cold weather affects blood pressure levels and heart health
Health Tips : किडनी स्टोनचा धोका वाढवतात रोजच्या 'या' ७ सवयी; वेळीच सावध व्हा, अन्यथा...

कोणत्या लोकांनी काळजी घ्यावी?

उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीचे आजार, लठ्ठपणा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनीही नियमित रक्तदाब तपासावा.

रक्तदाब नियंत्रणात कसा ठेवावा?

  • दररोज नियमित व्यायाम करा.

  • आहारातील मिठाचे प्रमाण कमी ठेवा.

  • फळे आणि हिरव्या भाज्या खा.

  • पुरेसे पाणी प्या.

  • पुरेशी झोप घ्या.

  • मद्यपान टाळा.

  • डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्या.

उच्च रक्तदाबाला 'सायलेंट किलर' म्हटले जाते. कारण रक्तदाब वाढला तरी अनेकदा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. रक्तदाब वारंवार १३०/९० पेक्षा जास्त येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. १८०/१२० किंवा त्यापेक्षा जास्त रक्तदाब आढळल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास किंवा बोलण्यात अडचण असल्यास त्वरित रुग्णालयात जा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.