Mumbai : ठाण्यात सोशल मीडिया स्टारच्या घराबाहेर गोळीबार; पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या, नेमकं झालं काय होतं?

Firing At Nadeem Khan House : प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Firing At Nadeem Khan House
Mumbaisaam tv
Published On
Summary

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घराबाहेर गोळीबार झाला.

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.

ठाण्यात सोशल मीडिया स्टारच्या घराबाहेर गोळीबार झाला आहे.

मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाण्यात सोशल मीडिया स्टारच्या घराबाहेर गोळीबार झाला आहे. मुंब्रा कौसा येथील अरमान को. ऑ. हौसिंग सोसायटी परिसरात शनिवारी (7 मार्च 2026) पहाटे फायरिंगची घटना घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून पोलीसांनी पाठलाग करून आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे 4.54 वाजता अरमान को.ऑ. हौसिंग सोसायटी, अल्मास कॉलनी, कौसा येथे फायरिंग झाल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार बीट क्रमांक ३ चे बीट मार्शल काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत, सोनवणे आणि तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

ही गोळीबारची घटना नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान यांच्या घराबाहेर घडली. त्यांचे वय 45 वर्ष होते. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या MH 03 CN 5900 क्रमांकाच्या कारवर दोन गोळ्या झाडल्या तसेच एक गोळी हवेत फायर केली. दरम्यान, पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार, आचार गल्ली येथील भंगार गोदामाजवळ आरोपी लपलेले होते.

पोलीस पथक तेथे पोहोचताच आरोपीने दोन पिस्टलमधून पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यानंतर आरोपी पळत गेला आणि पुन्हा फायरिंग करत राहीला.पोलीसांनी पाठलाग करत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने केलेल्या फायरिंगमध्ये दोन जण जखमी झाले. जखमींना तातडीने काळसेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शेवटी पोलीसांना आरोपीला पकडण्यात यश मिळवले. आरोपीच्या ताब्यातून दोन पिस्टल, चार काडतुसे आणि चार मॅगझिन जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शहाबाद उर्फ शब्बू मुन्ना शमशाद कुरेशी (वय २८) असून तो मुंब्रा येथील रहिवासी आहे. त्याच्यावर दिल्लीतील जाफराबाद परिसरातील चार पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीसांनी दिली. तसेच तो यापूर्वी तिहार कारागृहात आठ वर्षे शिक्षा भोगून आला आहे.

या घटनेतील आणखी एका संशयित साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, नदीम खान यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती पोलीसांनी दिली. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.

Firing At Nadeem Khan House
MasterChef India 9 Winner : महाराष्ट्रात आली 'मास्टर शेफ'ची ट्रॉफी; 2 भावांना किती मिळले बक्षीस? पारंपरिक चवीने जिंकली लाखो लोकांची मने

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com