MasterChef India 9 Winner : महाराष्ट्रात आली 'मास्टर शेफ'ची ट्रॉफी; 2 भावांना किती मिळले बक्षीस? पारंपरिक चवीने जिंकली लाखो लोकांची मने

MasterChef India 9 Winner - Nagpur brother : 'मास्टर शेफ सीझन ९'चा ग्रँड फिनाले पार पडला आहे. मराठमोळ्या जोडीने 'मास्टर शेफ सीझन ९'चा किताब जिंकला. त्यांना बक्षिसात काय मिळाले, जाणून घेऊयात.
MasterChef India 9 Winner - Nagpur brother
MasterChef India 9 Winner saam tv
Published On
Summary

'मास्टर शेफ सीझन ९'चा विजेता मराठमोळी जोडी झाली.

नारपूरच्या दोन भावांनी 'मास्टर शेफ सीझन ९'ची ट्रॉफी उचलली.

पारंपरिक चवीने लाखो लोकांची मने जिंकली.

लोकप्रिय कुकिंग शो मास्टर शेफचा नुकताच 9 वा सीझन पार पडला आहे. या 'मास्टरशेफ इंडिया सीझन 9'चा (MasterChef India 9 ) ग्रँड फिनाले 6 मार्चला पार पडला आहे. यावेळी मराठमोळ्या जोडीने बाजी मारली आहे. नागपूरच्या विक्रम आणि अजिंक्य गंधे या दोन भावांनी 'मास्टरशेफ इंडिया सीझन 9' चा किताब जिंकला आहे. आपल्या मराठमोळ्या, पारंपरिक चवीने त्याने प्रेक्षकांना, परीक्षकांना वेड लावले. त्यांच्या हाताची चव परीक्षकांना खूप आवडली.

बक्षीस काय?

विक्रम आणि अजिंक्य गंधे यांनी आपल्या साध्या भोळ्या स्वभावाने सर्वांची मने जिंकली. ही जोडी पहिली फायनलिस्ट बनली. तसेच सीझनची सर्वात गाजलेली जोडी होती. नागपूरची मराठमोळी भावांची जोडी विक्रम आणि अजिंक्य गंधे यांना सुंदर 'मास्टरशेफ इंडिया सीझन 9' ची ट्रॉफी मिळाली. तसेच तब्बल 25 लाखांचे बक्षीस त्यांनी जिंकले. दोघांना 'Golden Apron' देखील मिळाले. सध्या सर्वत्र या दोघांवर कौतुकाचा, शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.

'मास्टरशेफ इंडिया'चा नववा सीझन जानेवारीमध्ये सुरू झाला. ज्यामध्ये पहिल्यांदाच जोडी फॉर्मेट पाहायला मिळाला. ज्यामध्ये कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन स्पर्धा खेळली. प्रसिद्ध शेफ विकास खन्ना, रणवीर ब्रार आणि कुणाल कपूर हे शोचे परीक्षक होते. ग्रँड फिनालेला प्रसिद्ध शेफ संजीव कपूर देखील होते. या सीझनमध्ये स्पर्धकांना समकालीन शैलींसह भारतीय चव अनोख्या पद्धतीने सादर करण्यास प्रोत्साहित केले.

मिस्ट्री बॉक्स चॅलेंजपासून ते हाय-प्रेशर एलिमिनेशन राउंडपर्यंत स्पर्धा हळूहळू तीन फायनलिस्टपर्यंत येऊन पोहचली. अंजू प्रधान आणि मंजू ओझा या बहिणींची जोडी मास्टशेफची पहिली उपविजेती जोडी ठरली आहे. तर दुसरी उपविजेते पद हैदराबाद मधील चंदना आणि साई श्री राचकोंडा या आई-मुलीच्या जोडीने पटकावले.

मीडिया रिपोर्टनुसार, विक्रम गंधे याने कॉमर्स शाखेतून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचा फॅमिली बिझनेस देखील आहे. अजिंक्य हा आर्किटेक्चर आहे. त्यांनी लहानपणापासूनच स्वयंपाकाची आवड होती. त्यांचा नागपूरमध्ये स्वत:चा कॅफे आहे.

MasterChef India 9 Winner - Nagpur brother
Anurag Dobhal : प्रसिद्ध युट्यूबरने बायकोला केली मारहाण; कानाखाली मारली अन्..., भावाने केला धक्कादायक खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com