Gaurav Khanna-Akansha Chamola
Gaurav Khannasaam tv

Gaurav Khanna : "दिल हमेशा कुर्बान होता है..."; बिग बॉस विजेता गौरव खन्ना अन् आकांक्षा चमोला यांचा 9 वर्षांचा संसार मोडला?

Gaurav Khanna-Akansha Chamola : 'बिग बॉस 19' चा विजेता गौरव खन्ना आणि त्याची बायको आकांक्षा चमोला यांच्या नात्यात दुरावा आला असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अभिनेत्रीच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Published on
Summary

टिव्ही अभिनेता गौरव खन्ना हा 'बिग बॉस 19' चा विजेता ठरला.

'बिग बॉस 19' पासून गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला चर्चेत आहेत.

आकांक्षा चमोलाच्या पोस्टने गौरव खन्ना आणि तिच्या नात्याने दुरावा आल्याचे बोले जात आहे.

'बिग बॉस 19'चा विजेता गौरव खन्ना सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. 'बिग बॉस 19' या शोपासून त्याचे वैयक्तिक आयुष्य समोर आले आहे. गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांच्या लग्नाला 9 वर्ष पूर्ण झाली पण त्यांना मुल नाही, याचा खुलाचा स्वतः गौरवने बिग बॉसच्या घरात केला. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित राहिले. मात्र गौरव खन्ना कायम आपल्या बायकोच्या पाठी खंबीर उभा राहिला. 'बिग बॉस 19'नंतर प्रत्येक कार्यक्रमाला गौरव खन्ना आकांक्षा चमोलासोबत दिसला.

गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोलाचा रोमँटिक अंदाज पाहून चाहते कायम भारावून जायचे. मात्र आता गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांच्या नात्यात दुरावा आल्याचे बोले जात आहे. अभिनेत्री आकांक्षा चमोलाच्या पोस्टने या चर्चांना उधाण आले आहे. आकांक्षाने सोशल मीडियावर Cryptic पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तीने नात्यांवर भाष्य केले आहे. ज्यामुळे त्यांच्या संसार मोडला असल्याचे बोले जात आहे. दोघांचा मोठा चाहता वर्ग आहे.

आकांक्षा चमोला पोस्ट

"जिस रिश्ते की बुनियाद में सिर्फ जरूरतें हैं। वहा दिल हमेंशा कुर्बान होता है।" (जे नाते फक्त गरजांवर आधारित असते, तिथे नेहमीच हृदयाचा त्याग होतो)

गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला या दोघांनी या गोष्टीवर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. मात्र या पोस्टने चाहते नाराज आणि टेन्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. आकांक्षा चमोलाची ही पोस्ट वाऱ्यासारखी इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तसेच यावर नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. काही लोक तर त्यांच्या घटस्फोटाबद्दल अंदाज लावत आहेत.

आकांक्षा फॅमिली वीकमध्ये बिग बॉसच्या घरात आली होती. तेव्हा तिने मुले न होण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल सांगितले की, "मला याची भीती वाटत नाही. मुल होणे हे सोपे काम नाही. ही एक मोठी जबाबदारी आहे. मला वाटत नाही की, मी ते काम इतक्या चांगल्या प्रकारे हाताळू शकेन. या वयात, कोणत्याही वयात. मला माझे करिअर घडवायचे आहे. माझ्या खूप महत्त्वाकांक्षा आहेत. जरी लोक त्याला स्वार्थी म्हणत असले तरी."

Gaurav Khanna-Akansha Chamola
Ranveer Singh : रणवीर सिंहच्या विरोधात FIR दाखल; 'ती' एक चूक पडली महागात, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com