Ranveer Singh : रणवीर सिंहच्या विरोधात FIR दाखल; 'ती' एक चूक पडली महागात, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

FIR Filed Against Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या विरोधात FIR दाखल करण्यात आले आहे. यामागचे नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.
FIR Filed Against Ranveer Singh
Ranveer Singhsaam tv
Published On
Summary

रणवीर सिंहच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे.

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप रणवीर सिंहवर करण्यात आला आहे.

बेंगळुरू पोलिस स्टेशनमध्ये रणवीरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉलिवूडचा 'धुरंधर' रणवीर सिंह चांगलाच अडचणीत अडकला आहे. रणवीर सिंहविरुद्ध बेंगळुरूमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिकडेच एका कार्यक्रमात रणवीरने 'कांतारा' दैवाची विनोदी पद्धतीने नक्कल केली होती. ज्यामुळे त्याला ट्रोलिंगला समोरे जावे लागले होते. तसेच त्याने यासंबंधित माफी देखील मागितली होती. चावूंडी दैवाचा उल्लेख भूत म्हणून केल्याबद्दल अभिनेत्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हिंदू धार्मिक भावना आणि किनारी कर्नाटकातील चावूंडी दैवाचा परंपरेचा अपमान केल्याबद्दल रणवीर सिंहविरुद्ध बेंगळुरूमधील हाय ग्राउंड्स पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बुधवारी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. रणवीर सिंहने 'कांतारा' दैवाची मिमिक्री नोव्हेंबर 2025 रोजी गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात घडली.

रणवीर सिंहविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 196, 299 आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेंगळुरू येथील वकील प्रशांत मेथल (46) यांनी ही तक्रार दाखल केली आहे. एफआयआरनुसार, तक्रारदाराने आरोप केला आहे की, रणवीर सिंहने अपमानास्पद टिप्पणी केली आणि पूजनीय देवता परंपरेचा अपमान करणारे स्टेज अ‍ॅक्ट केले. अभिनेत्याने पंजुर्ली आणि गुलिगा देवतांशी संबंधित अभिव्यक्तींचे अश्लील आणि हास्यास्पद नक्कल केली. तसेच पवित्र चावूंडी दैवतेचा उल्लेख भूत म्हणून केला आहे.

बेंगळुरूमध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सांगितले आहे की, चावूंडी दैव ही कर्नाटकच्या किनारी प्रदेशात पूजनीय देवी आहे, जी दैवी स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. त्यामुळे देवतेचे भूत म्हणून चित्रण करणे ही एक मोठी चूक आहे. ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या आहेत आणि भक्तांना मानसिक त्रास झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा खटला बेंगळुरूमधील मुख्य महानगर दंडाधिकारी (सीएमएम) न्यायालयात चालवला जाणार आहे. ज्याची सुनावणी 8 एप्रिल रोजी होणार आहे.

तक्रारीकर्त्याने सांगितले की, 2 डिसेंबर 2025 रोजी, बेंगळुरूमधील कर्नाटक राज्य बिलियर्ड्स असोसिएशनच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून स्क्रोल करत असताना, त्यांना या सादरीकरणाचा एक व्हिडिओ आढळला. हा व्हिडिओ ब्रीफ चॅट नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावण्याच्या, समाजात द्वेष आणि शत्रुत्वाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा आल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

FIR Filed Against Ranveer Singh
Ajit Pawar Death : "अजित दादा खूप आठवण येत राहील..."; मराठमोळ्या अभिनेत्याची काळीज चिरणारी पोस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com