Ajit Pawar Death : "अजित दादा खूप आठवण येत राहील..."; मराठमोळ्या अभिनेत्याची काळीज चिरणारी पोस्ट

Sankarshan Karhade Emotional Post After Ajit Pawar Death : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी निधन झाले. त्यानंतर कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करून दुःख व्यक्त करताना दिसत आहेत.
Sankarshan Karhade Emotional Post After Ajit Pawar Death
Ajit Pawar Death saam tv
Published On
Summary

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.

अजित पवारांच्या निधनानंतर कलाकारांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने अजित दादांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नाव अजित पवार यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी आजवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे योगदान दिले आहे.अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीतून कलाकारांनी भावुक पोस्ट शेअर करून अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख, कंगना रणौत, अक्षय कुमार, अनुपम खेर यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच मराठी कलाकार सुबोध भावे, केतकी चितळे, धनंजय पोवार, आदेश बांदेकर, मेघा धाडे, आर्या आंबेकर, विशाखा सुभेदार, हेमंत ढोमे अशा अनेक कलाकारांनी भावनिक पोस्ट केली आहे. अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अशात मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने देखील अजित पवारांच्या आठवणीत खूपच Emotional पोस्ट केली आहे.

संकर्षण कऱ्हाडे पोस्ट

"मा. अजित पवार सरांचं जाणं फार दुर्दैवी...काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, कोणत्या पदावर आहेत ह्यापेक्षा ती महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत राहिली की , आधार वाटतो... त्यातले अजित दादा पवार हे तसे आधार वाटायचे...आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही असं वाटतं आहे... खूप त्रास होतोय...गंभीर प्रश्नांवर पण मिश्किल उत्तर देऊन पत्रकार परिषद गप्पांमध्ये बदलायची त्यांची शैली कमाल होती...त्यांच्या पंखाखाली असलेले अनेक कार्यकर्ते आज पोरके झाले ही भावना मी समजू शकतो...अपघातात त्यांच्यासह प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो...अजित दादा...खूप आठवण येत राहील..."

संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. संकर्षण कऱ्हाडे यांनी अजित पवारांना आपल्या घरातला माणूस म्हटले आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंब बारामतीला पोहचले आहेत. कार्यकर्ते, नेते मंडळी, पवार कुटुंब ढसाढसा रडताना दिसत आहे. समाजातील गरजू लोकांसाठी लढताना कायम अजित पवार पुढे पाहायला मिळाले.

Sankarshan Karhade Emotional Post After Ajit Pawar Death
Ajit Pawar Death : "माझा देव चोरला, माझ्या आई-वडीलांनंतर..."; अजित पवारांच्या निधनानंतर सूरज चव्हाणची Emotional पोस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com