sankarshan karhad Post: लोकप्रिय मराठी अभिनेता आणि नाटककार संकर्षण कऱ्हाडेने परभणीतील रंगमंचांची दुर्दशा उघड करत एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकाचा मराठवाडा दौरा सुरू असून, परभणी येथे व्यावसायिक नाटक सादर करण्यासाठी एकही सुसज्ज रंगमंच उपलब्ध नसल्याचे त्याने सांगितले आहे.
संकर्षणने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, “परभणीसारख्या मोठ्या जिल्ह्यात व्यावसायिक नाटक सादर करण्यासाठी एकही रंगमंच उपलब्ध नाही म्हणून खूप वाईट वाटलं. इथे नाटक बसवता येत नाही, हे कळाल्यावर मनावर आघात बसला.”
त्याने परभणीतील रंगभूमीची स्थिती सुधारण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन केले. “तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांसाठी आम्ही नाटक करतो. पण नाटकासाठी रंगमंचच नसेल, तर हे व्यथित करणारं आहे,” असे त्यांनी नमूद केले.
‘कुटुंब किर्रतन’ नाटकाचा दौरा सध्या मराठवाडा विभागात सुरू असून, २३ जून रोजी नांदेड, २४ जूनला लातूर आणि २५ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे प्रयोग होणार आहेत. परभणीतील रंगमंचांची परिस्थिती सुधारल्यास, तेथेही भविष्यात प्रयोग करण्याची इच्छा संकर्षणने व्यक्त केली.
या प्रकरणावरून ग्रामीण भागातील सांस्कृतिक पायाभूत सुविधांची दयनीय स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. कलाकारांनी आवाज उठवून हे प्रश्न मांडल्यामुळे प्रशासन आणि समाजाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.