List of winning candidates PMC Pune Mahanagarpalika elections : मुंबईनंतर पुणे ही राज्यातील सर्वात महत्त्वाची महापालिका म्हणून ओळखळं जातेय. मागील अनेक वर्षे पुण्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता राहिली. पण मागील १० वर्षांपासून पुणेकरांचा कौल भाजपच्या पारडण्यात पडल्याचे चित्र आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये पुण्यात भाजप एकहाती सत्ता स्थापन करत असल्याचे चित्र आहे. पुण्यात भाजपने ८७ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा भाजपचाच महापौर होणार,हे जवळपास निश्चित झालेय. दुसरीकडे अजित पवारांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे. पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ८० जागांवर आघाडीवर आहे.
पुण्यातील विजयी उमेदवारांची नावे समोर आली आहे. पुण्यात भाजपने प्रभाग क्रमांक १०, २०, ३६,२२, ८ मध्ये एकहाती वर्चस्व मिळवले आहे. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला पुण्यात अद्याप खातेही उघडता आलेले नाही. पुण्यातील विजयी उमेदवारांची यादी समोर आली आहे...
बॉबी टिंगरे भाजप प्रभाग - १
संगीता दांगट भाजप प्रभाग - १
अश्विनी भंडारी भाजप प्रभाग - १
डॉ. श्रेयस खांदवे, भाजप प्रभाग - ३
अनिल सातव, भाजप प्रभाग - ३
ऐश्वर्या पठारे, भाजप प्रभाग - ३
रामदास दाभाडे भाजप प्रभाग - ३
रूपाली पवार (प्रभाग १०)
दिलीप वेडेपाटील (प्रभाग १०)
किरण दगडे (प्रभाग १०)
अल्पना वरपे (प्रभाग १०)
महेश वाबळे (प्रभाग ३६)
सई थोपटे (प्रभाग ३६)
शैलजा भोसले (प्रभाग ३६)
वीणा घोष (प्रभाग ३६)
तन्वी दिवेकर (प्रभाग २०)
मानसी देशपांडे (प्रभाग २०)
राजेंद्र शिळीमकर (प्रभाग २०)
अ) मृणाल कांबळे (भाजप) प्रभाग २२
क) अर्चना पाटील (भाजप) प्रभाग २२
ड) विवेक यादव (भाजप) प्रभाग २२
08अ - परशुराम वाडेकर - भाजप
08ब - अजित गायकवाड - भाजप
08क - सपना छाजेड - भाजप
08ड - सनी उर्फ चंद्रशेखर निम्हण - भाजप
अर्चना जगताप - प्रभाग ४०
वृषाली कामठे - प्रभाग ४०
पूजा कदम - प्रभाग ४०
रंजना टिळेकर - प्रभाग ४०
कालिंदी पुंडे (भाजपा) - प्रभाग क्रमांक १८
कोमल शेंडकर (भाजपा) - प्रभाग क्रमांक १८
इतर पक्षाच्या विजयी उमेदवारांची यादी -
प्रशांत जगताप - काँग्रेस - प्रभाग क्रमांक १८
साहिल केदारी - काँग्रेस - प्रभाग क्रमांक १८
रफिक शेख (काँग्रेस) प्रभाग २२
गौरव घुले, राष्ट्रवादी काँग्रेस - प्रभाग २०
रेखा टिंगरे राष्ट्रवादी प्रभाग - 1
महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली होती. पण या युतीचा भाजपच्या लाटेसमोर काहीच फरक पडलेला दिसत नाही. पुण्यात भाजपने अख्खे पॅनेलच्या पॅनेल जिंकले आहेत. पुण्यामध्ये भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्याकडे आगेकूच मागली आहे. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेला अद्याप खातेही उघडता आले नाही. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ८० उमेदवार आघाडीवर आहेत. पुण्यात भाजपच दादा असल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.