Pune Mahanagar Palika Nivadnuk nikal : पुण्याचा दादा कोण? पहिला निकाल आला हाती, ३ जागांवर एकाच पार्टीचा विजय, भाजपचा पराभव

Pune municipal corporation election result live : पुणे महापालिका निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर झाला असून प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले.
Pune municipal election first result Ward 20 updates
Pune municipal election first result Ward 20 updates Saam TV Marathi
Published On

Pune municipal election first result Ward 20 updates : पुणे महानगरपालिकेचा पहिला निकाल हाती आला आहे. प्रभाग क्रमांक २० मधून चार जण विजयी झाले आहेत. या मतदारसंघात भाजपला एका जागेवर पराभवाचा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरव घुले यांनी प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजपचे ३ उमेदवार विजयी ठरले आहेत. पुण्याच्या सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपला जोरदार आघाडी मिळाली आहे. भाजपचे तब्बल ५० जण आघाडीवर आहेत. तर राष्टवादी काँग्रेसलाही पसंती दिली जातेय. काँग्रेसला मात्र मतदारांनी नाकारल्याची स्थिती आहे.

प्रभाग क्र. २० शंकर महाराज मठ बिबेवाडी प्रभागातून भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे राजेंद्र शिळीमकर, तन्वी दिवेकर, मानसी देशपांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव घुले विजयी झाले आहेत. गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र सुंदेचा यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक २० कडे पुण्याचे लक्ष लागले होते. त्यामध्ये भाजपने बाजी मारली आहे. ३ उमेदवार निवडून आले आहेत.

Pune municipal election first result Ward 20 updates
Municipal Elections : मतमोजणीआधीच महायुतीची त्सुनामी, राज्यात ६९ नगरसेवक विजयी, वाचा संपूर्ण यादी

काँग्रेसने खाते उघडले -

पुण्यात काँग्रेसने खाते उघडले. प्रशांत जगताप यांनी विजय खेछून आणला आहे. भाजपचा दारूण पराभव करत प्रशांत जगताप जिंकले आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या शिवरकरांचा प्रशांत जगताप यांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक १८ ड मधून प्रशांत जगताप यांनी निवडणूक लढवली. अटीतटीच्या लढतीत प्रशांत जगताप १८०० मताने जिंकले. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर हे ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपा मधे गेले होते. त्याच भाजपाच्या अभिजित शिवरकर यांचा प्रशांत जगताप यांनी पराभव केला.

वानवडी साळुंके विहार निवडणूक निकाल..

विजयी उमेदवार..

प्रशांत दादा जगताप (काँग्रेस)

साहिल केदारी (काँग्रेस)

कालिंदी पुंडे (भाजपा)

कोमल शेंडकर (भाजपा)

Pune municipal election first result Ward 20 updates
Mahanagar Palika Election Result : ठाकरे बंधूंची गाडी सुसाट, मुंबईत ६० जागांवर आघाडीवर, राज्यात भाजप सुसाट, वाचा सुरूवातीचे कल

EVM मशीन बदलल्याचा ठोंबरेंचा आरोप

पुण्यातील प्रभाग २५ मतमोजणी केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली ठोंबरे आक्रमक झाल्या. मशीन बदलल्याचा रूपाली ठोंबरे यांनी आरोप केला. मशीनचे नंबर मॅच होत नसल्याने रूपाली ठोंबरे आक्रमक झाल्या. मतमोजणी अधिकारी आणि रुपाली पाटील आणि पोलिस आणि कर्मचारी यांच्यात अरेरावी झाली.

Pune municipal election first result Ward 20 updates
Saam TV exit poll : पनवेलकरांचा कौल भाजपच्या बाजूने, शिंदेंना फक्त ३ जागा, वाचा सर्व्हेचा अंदाज काय सांगतोय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com