Mahanagar Palika Election Result : ठाकरे बंधूंची गाडी सुसाट, मुंबईत ६० जागांवर आघाडीवर, राज्यात भाजप सुसाट, वाचा सुरूवातीचे कल

Mahanagarpalika municipal corporation results : महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने आघाडी घेतली आहे.
Uddhav-Raj Thackeray Alliance
Uddhav-Raj Thackeray Alliancesaam tv
Published On

municipal corporation election result live : मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने आघाडी घेतली आहे. ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसला जोरदार धक्का बसल्याचे चित्र आहे. राज्यात आतापर्यंत भाजपचे जवळपास ४०० नगरसेवक आघाडीवर आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेचे १०० आघाडीवर आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सालापूरसह राज्यातील मोठ्या महापालिकांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे चित्र आहे. मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना ६४ तर महायुती ८० जागांवर आघाडीवर आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरीच चिंचवडमध्ये भाजप आघाडीचा पक्ष ठरलाय. सुरूवातीच्या कलांमध्ये मुंबईत भाजप ४२ जागांवर आघाडीवर आहे , तर ठाकरेंची शिवसेना २९ जागांवर आघाडीवर आहे. शिंदेंची शिवसेना १३, तर काँग्रेस ६ आणि मनसेचे २ नगरसेवक आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप खाते उघडता आलेले नाही.

Uddhav-Raj Thackeray Alliance
Saam TV exit poll : मुंबईत ठाकरेंच्या सत्तेला सुरूंग, राज्यात भाजप क्रमांक १ चा पक्ष, काँग्रेस तिसऱ्या स्थानावर, वाचा एक्झिट पोलचा अंदाज

पुण्यामध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. तर मनसेला अद्याप खातेही उघडता आलेले नाही. पुण्यात भाजप ३९ ठिकाणी आघाडीवर आहे,, तर राष्ट्रवादी १६ जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे आणि काँग्रेसचे एक एक उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने मुसंडी मारली आहे.

Uddhav-Raj Thackeray Alliance
Municipal Elections : मतमोजणीआधीच महायुतीची त्सुनामी, राज्यात ६९ नगरसेवक विजयी, वाचा संपूर्ण यादी

चंद्रपूरमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. सर्वाधिक जागांवर आघाडी घेत भाजपला धक्का दिला आहे. चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या सेनेनेही खाते उघडले आहे. भाजप फक्त ४ जागांवर आघाडीवर आहे. राज्यात इतर ठिकाणी काँग्रेसला हवं तसे यश मिळाले नसल्याचे चित्र आहे.

Uddhav-Raj Thackeray Alliance
Crime : भंयकर! आई अन् ३ मुलांचे अपहरण केलं अन् निर्घृण संपवलं, मृतदेह नदीच्या काठावर फेकले, नेमकं कारण काय?

मुंबईमध्ये ठाकरे बंधू ६० जागांवर आघाडीवर आहेत. तर शिंदे अन् भाजप ७५ जागांवर पुढे आहेत. मुंबईत काँग्रेस ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार आगाडीवर आगे. एक्झिट पोलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त ६० जागा सांगितल्या होत्या. पण मतपेट्या उघडताच ठाकरेंच्या बाजूला कल येत असल्याचे चित्र आहे.

Uddhav-Raj Thackeray Alliance
Crime : भंयकर! आई अन् ३ मुलांचे अपहरण केलं अन् निर्घृण संपवलं, मृतदेह नदीच्या काठावर फेकले, नेमकं कारण काय?

संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत असल्याचे चित्र आहे. भाजप १०, शिंदेंची शिवसेना १० आणि एमआयएम ९ जागांवर पुढे आहे. ठाकरेंची शिवसेना ४ आणि काँग्रेस २ जागांवर आघाडीवर आहे. अमरावतीत भाजप ७ तर काँग्रेस अन् ठाकरेंची शिवसेना ३ जागांवर आघाडीवर आहे.

Uddhav-Raj Thackeray Alliance
मार्कर शाई पुसलीच जात नाही, फेक नरेटिव्ह पसरवला जातोय, आयोगाकडून स्पष्टीकरण, वाचा नेमकं काय म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com