Municipal Elections : मतमोजणीआधीच महायुतीची त्सुनामी, राज्यात ६९ नगरसेवक विजयी, वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Civic Polls Result 2026 : मतमोजणी सुरू होण्याआधीच महायुतीला मोठे यश मिळाले. राज्यभरात तब्बल ६९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, त्यामध्ये महायुतीचे ६८ उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.
BJP gets maximum binvirodh corporators in Maharashtra :
MahayutiSaam Tv News
Published On

BJP gets maximum binvirodh corporators in Maharashtra : मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होत आहे. महापालिकांच्या निकालाचे आकडे समोर येण्यापूर्वीच महायुतीने राज्यात मोठे यश मिळावले आहेत. राज्यभरातून तब्बल ६९ उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक यश भाजपला मिळाले आहे. निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच भाजपला सर्वाधिक यश मिळाले आहे. १० वाजता निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यानंतर आयोगाकडून ६९ बिनविरोध उमेदवारांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

राज्यात निवडून आलेल्या बिनविरोध उमेदवारांमध्ये सर्वाधिक जागा कल्याण डोंबिवलीमधील आहेत. केडीएमसीमध्ये भाजपला सर्वाधिक १५ तर शिंदेंच्या शिवसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. जळगावमध्ये १२, पनवेलमध्ये ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात ७ तर भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.. अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २ उमेदवार निवडून आले आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि धुळे या शहरांतही भाजपने आपले खाते उघडलेय. मालेगावमधून इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध आला आहे.

कुणाचे कुठे बिनविरोध उमेदवार (Municipal Corporation Election 2026 Binvirodh Result)

कल्याण -डोंबिवली - २१ (भाजप- १५, शिंदे - ६)

जळगाव - १२ (भाजप- ६ ,शिंदे -६)

पनवेल - ८ (भाजप- ८)

ठाणे - ७ (शिंदे - ७)

भिवंडी - ६ (भाजप- ६)

अहिल्यानगर - ५ (भाजप- ३,राष्ट्रवादी (AP)- २)

धुळे - भाजप- ३

पुणे - भाजप- २

पिंपरी-चिंचवड - भाजप- २

मालेगाव - इस्लाम पार्टी - १

बिनविरोध उमेदवारांची यादी- (Binvirodh Candidate List Municipal Corporation Election 2026)

भाजपच्या बिनविरोध विजयी उमेदवारांची यादी -

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

प्रभाग १८ - रेखा चौधरी

प्रभाग २६ क - आसावरी नवरे

प्रभाग २६ ब - रंजना

प्रभाग २४ ब - ज्योती पाटील

प्रभाग २७ अ - मंदा पाटील

प्रभाग २६ अ -मुकुंद पेडणेकर

प्रभाग २७ ड -महेश पाटील

प्रभाग १९ क - साई शेलार

प्रभाग २३ क -हर्षदा भोईर

प्रभाग २३ अ -दीपेश म्हात्रे

प्रभाग २३ ड - जयेश म्हात्रे

प्रभाग ३० अ - रविना माळी

प्रभाग २५ ड - मंदार हळबे

प्रभाग 19 ब - डॉ.सुनिता पाटील

प्रभाग 19 अ - पूजा म्हात्रे

पनवेल महानगरपालिका -

प्रभाग १८ अ - ममता म्हात्रे

प्रभाग १८ ब - नितिन पाटील

प्रभाग १८ क - स्नेहल ढमाले

प्रभाग १९ अ - दर्शना भोईर

प्रभाग १९ ब - रूचिरा लोंढे

प्रभाग २० अ - अजय बहिरा

प्रभाग २० ब - प्रियांका कांडपिळे

भिवंडी महानगर पालिका -

प्रभाग १७ अ - सुमित पाटील

प्रभाग १६ अ - परेश चौगुले

प्रभाग १८ ब - दीपा मढवी

प्रभाग १८ अ - अश्विनी फुटाणकर

प्रभाग १८ क - अबू साद लल्लन

प्रभाग २३ ब - भारती चौधरी

धुळे महानगरपालिका

प्रभाग क्र १ - उज्ज्वला भोसले

प्रभाग ६ ब -ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील

प्रभाग १७ म- सुरेखा उगले़

अहिल्यानगर महानगरपालिका

प्रभाग 7 ब -अनिल बोरूडे

प्रभाग 2 ड - करण कराळे

प्रभाग 2 ब - सोनाबाई शिंदे

जळगाव महानगरपालिका

प्रभाग ७ अ - विशाल भोळे

प्रभाग ७ अ - दीपमाला काळे

प्रभाग १६ अ - डॉ वीरेन खडके

प्रभाग १३ क-वैशाली पाटील

प्रभाग ७-ब - अंकिता पाटील

प्रभाग १२ ब - उज्ज्वला बेंडाळे

पुणे महानगरपालिका

प्रभाग ३५ - मंजुषा नागपुरे

प्रभाग ३५ ड - श्रीकांत जगताप

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

प्रभाग ६ ब - रवी लांडगे

प्रभाग १० ब - सुप्रिया चांदगुडे

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे बिनविरोध उमेदवार

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

प्रभाग २४ अ - रमेश म्हात्रे

प्रभाग २४ ब -विश्वनाथ राणे

प्रभाग २४ क - वृषाली जोशी

प्रभाग २८ अ - हर्षल राजेश मोरे

प्रभाग ११ अ - रेश्मा निचळ

प्रभाग २८ ब - ज्योती मराठे

ठाणे महानगर पालिका -

प्रभाग १८ ब - जयश्री फाटक

प्रभाग १८ क - सुखदा मोरे

प्रभाग १७ अ - एकता भोईर

प्रभाग १८ ड - राम रेपाळे

प्रभाग १४ अ -शीतल ढमाले

प्रभाग ५ ब - जयश्री डेव्हिड

प्रभाग ५ अ -सुलेखा चव्हाण

जळगाव महानगर पालिका -

प्रतिभा देशमुख

विक्रम सोनवणे

मनोज चौधरी

रेखा पाटील

सागर सोनवणे

गौरव सोनवणे

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगरमध्ये २ ठिकाणी यश -

कुमार वाकळे

प्रकाश भागानगरे

मालेगावमध्ये इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख फकीर मोहम्मद बिनविरोध निवडून आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com