Mahanagarpalika Elections Result Live: ना ठाकरे, ना भाजप...मुंबईत काँग्रेसनंच उघडलं पहिलं विजयाचं खातं, शेवाळेंना दणका

BMC municipal corporation election result live : मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान काँग्रेसने पहिला विजय मिळवत खाते उघडले आहे. भाजप आणि ठाकरे शिवसेनेत जोरदार लढत सुरू असतानाच काँग्रेसने बाजी मारली आहे.
Congress
CongressSaam tv
Published On

ठाकरेंच्या मुंबईमध्ये पहिला विजय काँग्रेसने मिळवलाय. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर दोन तासांच्या आत काँग्रेसच्या उमदेवाराने विजयी पतका फडकावली. भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा असतानाच काँग्रेसने मजबूत पकड मिळवली आहे. मुंबईमध्ये काँग्रेसचे १५ पेक्षा जास्त उमेदवार उघाडीवर आहेत. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप आणि ठाकरेंमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. ही लढत सुरू असतानाच काँग्रेसने मुंबईत पहिलं विजयाचे खाते उघडलेय.

Congress
Mahanagar Palika Election Result : ठाकरे बंधूंची गाडी सुसाट, मुंबईत ६० जागांवर आघाडीवर, राज्यात भाजप सुसाट, वाचा सुरूवातीचे कल

मुंबईत काँग्रेसने खाते उघडले -

मायानगरी मुंबईमध्ये कुणाची सत्ता येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजप, ठाकरेंमध्ये जोरदार लढत सुरू आहे. मुंबईमध्ये काँग्रेसने पहिला विजय मिळवला आहे. प्रभाग - १८३ मध्ये काँग्रेसच्या आशा दीपक काळे यांनी विजय मिळवला आहे. मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेचा त्यांनी दारूण पराभव केला.

Congress
Saam TV exit poll : मुंबईत ठाकरेंच्या सत्तेला सुरूंग, राज्यात भाजप क्रमांक १ चा पक्ष, काँग्रेस तिसऱ्या स्थानावर, वाचा एक्झिट पोलचा अंदाज

काँग्रेसने मुंबईत पहिला विजय मिळवत बाजी मारली आहे. मुंबईमध्ये पहिला कौल काँग्रेसच्या पारड्यात गेला आहे. प्रभाग क्रमांक १८३ मधून आशा काळे यांनी १४५० मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी मनसेच्या पारुबाई कटके आणि शिवसेनेच्या वैशाली शेवाळे यांचा पराभव केला. तर राष्ट्रवादीच्या राजश्री खाडे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.

Congress
Municipal Elections : मतमोजणीआधीच महायुतीची त्सुनामी, राज्यात ६९ नगरसेवक विजयी, वाचा संपूर्ण यादी

शिवसेना खासदारांना धक्का -

शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांना काँग्रेसने जोरदार धक्का दिला आहे. प्रभाग क्रमांक १८३ मधून आशा काळे आणि वैशाली शेवाळे यांच्यामध्ये काटे कीं टक्कर झाली. यामध्ये काँग्रेसच्या आशा काळे यांनी १४५० मतांनी विजय मिळवला. वैशाली शेवाळे या खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिणी आहेत.

Congress
Crime : भंयकर! आई अन् ३ मुलांचे अपहरण केलं अन् निर्घृण संपवलं, मृतदेह नदीच्या काठावर फेकले, नेमकं कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com