पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने वयोवृद्ध, महिला आणि दिव्यांग तसेच इतर मतदारांसह नवोदित मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या महाउत्सवात उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. सकाळी ७.३० वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात पार पडली असून सुमारे सरासरी ५७.७१ टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
मतदारसंघातील दर दोन तासांची सरासरी मतदान टक्केवारी
८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयअंतर्गत सर्व मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.५६ टक्के मतदान झाले. तर सकाळी ११.३० वाजेपर्यंत मतदानाच्या प्रमाणात वाढ होऊन ते १६.३ टक्के इतके झाले. दुपारी १.३० वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण २८.१५ टक्के इतके झाले. त्यानंतर दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ४०.५ टक्के मतदान पार पडले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ५७.७१ टक्के मतदान पुर्ण झाले. सायंकाळच्या सत्रात मतदार अधिक संख्येने मतदान केंद्राकडे मतदानासाठी येत होते.
प्रभागनिहाय मतदान टक्केवारी -
प्रभाग क्र. १ – ६०.६१ टक्के
प्रभाग क्र. २ – ६४.९१ टक्के
प्रभाग क्र. ३ – ६०.९७ टक्के
प्रभाग क्र. ४ – ५७.०८ टक्के
प्रभाग क्र. ५ – ६१.५८ टक्के
प्रभाग क्र. ६ – ५५.७२ टक्के
प्रभाग क्र. ७ – ५८.३७ टक्के
प्रभाग क्र. ८ – ६०.१९ टक्के
प्रभाग क्र. ९ – ५६.९१ टक्के
प्रभाग क्र. १० – ४९.५४ टक्के
प्रभाग क्र. ११ – ५४.७१ टक्के
प्रभाग क्र. १२ – ६५.१४ टक्के
प्रभाग क्र. १३ – ५४.२७ टक्के
प्रभाग क्र. १४ – ५३.४४ टक्के
प्रभाग क्र. १५ – ५५.५६ टक्के
प्रभाग क्र. १६ – ६२.४५ टक्के
प्रभाग क्र. १७ – ६०.०४ टक्के
प्रभाग क्र. १८ – ५६.१८ टक्के
प्रभाग क्र. १९ – ४९.२२ टक्के
प्रभाग क्र. २० – ५५.४२ टक्के
प्रभाग क्र. २१ – ५६.७६ टक्के
प्रभाग क्र. २२ – ६०.२८ टक्के
प्रभाग क्र. २३ – ६३.३७ टक्के
प्रभाग क्र. २४ – ६१.७२ टक्के
प्रभाग क्र. २५ – ६०.४८ टक्के
प्रभाग क्र. २६ – ५५.३० टक्के
प्रभाग क्र. २७ – ६१.०१ टक्के
प्रभाग क्र. २८ – ५४.८८ टक्के
प्रभाग क्र. २९ – ५४.५९ टक्के
प्रभाग क्र. ३० – ५४.२२ टक्के
प्रभाग क्र. ३१ – ५२.०० टक्के
प्रभाग क्र. ३२ – ५७.५९ टक्के