A.R Rahman: 'मला कधीही कोणालाही दुखवायचं...'; ए.आर. रहमान यांनी बॉलिवुड 'धार्मिक राजकारण' वादावर दिलं स्पष्टीकरण

A.R Rahman controversy: संगीतकार ए.आर. रहमान यांना एका वक्तव्यामुळे ट्रोल करण्यात येत आहे. आता त्यांनी आपले मौन सोडले आहे आणि म्हटले आहे की त्यांचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता.
AR Rahman
AR RahmanSaam Tv
Published On

A.R Rahman controversy: ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी अलीकडेच त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. यामध्ये त्यांनी "पॉवर चेंज" आणि "सांप्रदायिक" कारणांमुळे बॉलिवूडमध्ये काम न मिळाल्याचे कारण दिले. अनेक चित्रपट कलाकारांनी या विधानावर टीका केली आणि ते "अयोग्य" म्हटले. ए. आर. रेहमान यांनी आता एका व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण दिले आहे.

ए.आर. रहमान यांनी सांगितले की त्यांना कधीही कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. त्यांनी नेहमीच त्यांच्या संगीताद्वारे देशाची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी "माँ तुझे सलाम/वंदे मातरम" ची क्लिप दाखवून समारोप केला. व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की भारत नेहमीच त्यांचे घर आणि शिक्षक राहिला आहे. ते म्हणाले, "संगीत नेहमीच आमच्या संस्कृतीशी जोडण्याचा मार्ग राहिला आहे. भारत माझे घर, माझे गुरु आणि माझी प्रेरणा आहे. माझा कधीही कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मला आशा आहे की माझा मुद्दा समजला जाईल."

AR Rahman
Rajkummar Rao-Patralekha: आमच्या बाळाचं नाव काय? राजकुमार राव-पत्रलेखाने शेअर केलं त्यांच्या मुलीचं क्यूट नाव

रहमान यांनी स्पष्टीकरण दिले

ए.आर. रहमान पुढे म्हणाले, "मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे कारण त्यामुळे मला अशी जागा निर्माण करता येते जिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते विविधता आणि सर्जनशील स्वातंत्र्याला महत्त्व देणाऱ्या वातावरणात काम करण्याचे भाग्य मला लाभले आहे आणि भारतीय असल्याने विविध बहुसांस्कृतिक आवाजांशी जोडण्याची संधी मिळाली आहे.

AR Rahman
Tighee Movie: आई–मुलींच्या नात्याच्या नाजूक छटा उलगडणारा; सोनाली कुलकर्णीच्या 'तिघी' चित्रपटाचा इमोशनल टीझर प्रदर्शित

ए.आर. रहमान काय म्हणाले?

शेवटी, त्यांनी सांगितले की ते या राष्ट्राचे आभारी आहेत आणि उत्तम उत्तम संगीत देण्याचा प्रयत्न ते नेहमीचं करत राहतील. बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत रहमान म्हणाले, "गेल्या आठ वर्षांत बॉलीवुडमध्ये पॉवर चेंज झाली आहे. तसेच तिथे क्रिएटिव्ह नसलेले लोक निर्णय घेत आहेत आणि ही एक धार्मिक राजकारण गोष्ट झाली असू शकते." त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com