Dhurandhar Collection : 'धुरंधर'ची 400 कोटींच्या क्लबमध्ये थाटात एन्ट्री, रणवीर सिंह अन् अक्षय खन्नाची जोडी सुपरहिट

Dhurandhar Box Office Collection Day 12 : 'धुरंधर' चित्रपटाने 12 दिवसांत 400 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. रणवीर सिंह आणि अक्षय खन्नाची जोडी सुपरहिट ठरली.
Dhurandhar Box Office Collection Day 12
Dhurandhar CollectionSAAM TV
Published On
Summary

'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबरपासून बॉक्स ऑफिस गाजवत आहे.

'धुरंधर' चित्रपटाने 400 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

'धुरंधर' रणवीर सिंहच्या कारकिर्दीतील नंबर 1 चित्रपट ठरला.

बॉलिवूड अभिनेते रणवीर सिंह आणि अक्षय खन्नासाठी 2025 खूप खास ठरले. 'धुरंधर' रणवीर सिंहच्या कारकिर्दीतील नंबर 1 चित्रपट ठरला. तर अक्षय खन्नाने 2025मध्ये दोन सुपरहिट चित्रपट केले. पहिला 'छावा' आणि दुसरा 'धुरंधर' दोन्ही चित्रपटांमध्ये त्याने खलनायकाची भूमिका साकारली. 'धुरंधर' ने 12 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा गल्ला जमावला आहे.

'धुरंधर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 12

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'धुरंधर' चित्रपटाने 12 व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या बुधवारी तब्बल 30.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत सिनेमाने जवळपास 411.25 कोटींच्या आसपास व्यवसाय केला. अक्षय खन्नाच्या चित्रपटाने जगभरात 623.5 कोटी कमावले आहेत. आता 'धुरंधर' चित्रपटाने 500 कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

  • पहिला दिवस - 28 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 32 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 43 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 23.25 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 27 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 27 कोटी रुपये

  • सातवा दिवस -27 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 32.5 कोटी रुपये

  • नववा दिवस - 53 कोटी रुपये

  • दहावा दिवस -58 कोटी रुपये

  • अकरावा दिवस - 30.5 कोटी रुपये

  • बारावा दिवस - 30.00 कोटी रुपये

  • एकूण - 411.25 कोटी रुपये

'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला. कंधार अपहरण आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह अनेक सत्य घटनांपासून चित्रपट प्रेरित आहे. धुरंधर' चित्रपट आदित्य धर याचा आहे. 'धुरंधर' हा ॲक्शन चित्रपट आहे.'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, आर माधवन, राकेश बेदी हे तगडे कलाकार झळकले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर' चित्रपटाचे बजेट 250 कोटींच्या अधिक आहे. त्यामुळे चित्रपट अशीच कमाई करत राहिला तर लवकरच आपले बजेट वसूल करेल. 'धुरंधर' चा भाग दोन देखील येणार आहे.'धुरंधर' चित्रपट थिएटर गाजल्यावर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लेटफॉर्म पाहता येणार आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत रिलीज डेट समोर आली नाही.

Dhurandhar Box Office Collection Day 12
Akshaye Khanna : 'धुरंधर'च्या यशानंतर अक्षय खन्ना पोहचला अलिबागला; घराची केली वास्तुशांती, VIDEO होताय व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com