Shreya Maskar
रणवीर सिंहचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर' 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'धुरंधर' हा ॲक्शन चित्रपट आहे.
'धुरंधर' कंधार अपहरण आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह अनेक सत्य घटनांपासून चित्रपट प्रेरित आहे.
'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, आर माधवन, राकेश बेदी हे तगडे कलाकार झळकले आहेत.
Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, 'धुरंधर' ने पहिल्या दिवशी शुक्रवारी तब्बल 27 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'धुरंधर'ने 'सैयारा', 'पद्मावत', 'गली बॉय' या चित्रपटांना मागे टाकले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर' चित्रपटाचे बजेट 250 कोटींच्या अधिक आहे. त्यामुळे चित्रपट अशीच कमाई करत राहिला तर लवकरच आपले बजेट वसूल करेल.
रणवीर सिंह आणि सारा अर्जुनची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. 'धुरंधर' चा भाग दोन देखील येणार आहे. 'धुरंधर' चित्रपटातील डायलॉग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर' चित्रपट थिएटर गाजल्यावर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लेटफॉर्म पाहता येणार आहे. 'धुरंधर' चे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने खरेदी केले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, रणवीर सिंहचा 'धुरंधर' चित्रपट 30 जानेवीरी 2026 ला किंवा त्याच्या आसपास ओटीटीवर पाहता येईल. 'धुरंधर' नवीन वर्षाव ओटीटीवर येईल. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.