Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक आता 'नॅशनल क्रश' बनली आहे. तिने मराठीसोबत हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या कामाची छाप पाडली आहे.
काही महिन्यांपूर्वी गिरिजा ओकने एक मुलाखत दिली. तेव्हापासून तिचे फोटो व्हायरल झाले आणि ती 'नॅशनल क्रश' बनली. यात तिने सुंदर निळ्या रंगाची साडी नेसली होती.
अशात आता पुन्हा गिरिजा ओकने सुंदर साडीतील फोटो शेअर केले आहे. गिरिजाने समुद्रकिनारी मनमोहक फोटोशूट केले आहे. ज्याचे खास फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गिरिजाने फिकट गुलाबी रंगाची चेकर्ड साडी नेसली आहे. साडीला मॅचिंग ब्लॉऊज तिने घातला आहे. लूकला मॅचिंग ज्वेलरी, मिनिमल मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
मोकळ्या केसांमध्ये तिचे सौंदर्य खुलून आले आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या फोटोंवर चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
गिरिजा ओकने रंगीत तसेच ब्लँक अँड व्हाइट फोटोंची सीरिज शेअर केली आहे. याला तिने खूप सुंदर गाणे देखील लावले आहे. "हम आप की आँखों में इस दिल को बसा दें तो..." असे गाण्याचे बोल आहेत.
"The charm of Grayscale" असे हटके कॅप्शन तिने फोटोंना आणि व्हिडीओंना दिले आहे. फोटोतील तिच्या कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
गिरिजा ओकच्या फोटोंवर चाहत्यांसोबत कलाकार देखील कमेंट करत आहेत. "सुंदर", "Heart of मराठी", "मस्त फार सुंदर दिसत आहेस..." तसेच खूप Heart इमोजी पाहायला मिळत आहेत.