Shreya Maskar
2 डिसेंबर 2025 ला आदेश बांदेकरांचा लेक सोहम बांदेकर लग्न बंधनात अडकला आहे. सोहम बांदेकरने अभिनेत्री पूजा बिरारीसोबत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.
सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांचे लोणावळ्यातील रिसॉर्टमध्ये शाही विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात दोन्ही कुटुंबीय, मित्रमंडळी, कलाकार पाहायला मिळाले.
सोहम आणि पूजाचे लग्नाचे सर्व समारंभ हळद, मेहंदी, साखरपुडा, केळवण , संगीत थाटामाटात पार पडले. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
लग्न सोहळ्यासाठी पूजाने सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तर सोहमने गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघे एकत्र खूपच सुंदर आणि आनंदी दिसत होते.
सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांचे लव्ह मॅरेज आहे. संगीत सोहळ्याला त्यांच्या केमिस्ट्री, रोमँटिक अंदाजाने चार चाँद लावले.
पूजा बिरारीने केळवण समारंभात खास उखाणा घेऊन आपल्या नात्याची कबुली दिली. पूजा उखाणा घेत म्हणाली, "घरात चालले मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर, माझे अहो म्हणजे सोहम होणार माझे मिस्टर"
सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांनी 'मुझसे शादी करोगी...' या गाण्यावरती रोमँटिक डान्स केला. तसेच संगीत सोहळ्यात आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पूजा बिरारी बांदेकरांची सून झाली आहे. सध्या पूजा बिरारी 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत पाहायला मिळत आहे. मालिकेतही पूजाच्या लग्नाचा सीन पाहायला मिळत आहे.