Shreya Maskar
लग्नानंतर सूरज चव्हाण बायकोसोबत देव दर्शनाला गेला आहे. याची खास पोस्ट सूरजने सोशल मीडियावर केली आहे. जी तुफान व्हायरल होत आहे.
सूरजने संजनाला उचलून जेजुरी गडा पार केला. दोघांनी एकत्र खंडोबाचे दर्शन घेतले. मंदिरात 'यळकोट यळकोट जय मल्हार' चा जयघोष ऐकू आला.
सूरज चव्हाण आणि संजना जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला गेले आहेत. सूरजने यासंबंधित दोन पोस्ट केल्या आहेत. एकात जेजुरी गडावरील फोटो पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या पोस्टमध्ये एक व्हिडीओ आहे. ज्यात त्यांचे देवदर्शन पाहायला मिळत आहे.
फोटो शेअर केलेल्या पोस्टला सूरजने खूप हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "मल्हारी माझा जगाचा राजा, आलोय जोडीने दर्शनाला" दोघेही फोटोंमध्ये जोडीने दर्शन घेताना दिसत आहेत.
तर एक खास व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "काय सांगू खंडेराया या दिवसांसाठी मी किती वाट पाहिली, अशीच राहू दे तुझ्या कृपेची अविरत सावली..."
सूरजच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्साचा वर्षाव होत आहे. चाहते त्यांच्या जोडीचे, त्यांच्या केमिस्ट्रीचे कौतुक करताना दिसत आहेत.
सूरज चव्हाण एक रील स्टार आहे. मात्र बिग बॉस मराठीनंतर सूरज चव्हाणला खूप लोकप्रियता मिळाली. त्याची 'झापुक झपूक' चित्रपट देखील आला. चित्रपटातील गाणी खूप गाजली.
नवीन घरात सूरज चव्हाणने आपल्या नवीन संसाराला सुरुवात केली आहे. लग्नाआधीचे अनेक समारंभ सूरजच्या नवीन घरातच पार पडले. सूरज आणि संजना यांचे लव्ह मॅरेज आहे.