Shreya Maskar
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग लवकरच आई होणार आहे. ती दुसऱ्यांदा गोंडस बाळाला जन्म देणार आहे. नुकतेच भारतीने भन्नाट मॅटर्निटी शूट केले आहे.
नुकतेच भारतीने तिच्या ग्लॅमरस लूकचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या अंदाजातील फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
भारती सिंग बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सी ग्लो पाहायला मिळत आहे. ज्यामुळे तिचे सौंदर्य खुलले आहे.
भारतीने मॅटर्निटी शूटसाठी आकाशी रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला आहे. ज्यावर सुंदर पांढऱ्या रंगाची मोठी फुलं असलेले नेटचे जॅकेट तिने घातले आहे. फुलांनी ड्रेसची शोभा वाढवली आहे.
भारती सिंगने या फोटोंना हटके कॅप्शन दिल आहे. तिने लिहिलं की, "दुसरा बेबी लिंबाचिया लवकरच येत आहे..." प्रत्येक फोटोमध्ये भारती खूपच सुंदर दिसत आहे.
भारती सिंगच्या या फोटोंवर चाहते, कलाकार मंडळी यांच्याकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करत आहेत. तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. तसेच तिला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.
2017ला भारती सिंगने लेखक हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2022 मध्ये तिने लक्ष सिंग लिंबाचियाला जन्म दिला. लक्षचे टोपणनाव गोला आहे.
भारती सिंगने अनेक मुलाखतीत सांगितले आहे की, तिला दुसरी मुलगी हवी आहे. भारती आणि हर्षला मुली खूप आवडतात.