Shreya Maskar
'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाणचे लग्न 29 नोव्हेंबरला मामाची मुलगी संजनासोबत थाटात पार पडले. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सूरज चव्हाणच्या लग्नात करवलीचा थाट पाहायला मिळाला. सूरजच्या लग्नात त्याची बहीण जान्हवी किल्लेकर पोहचली. लग्नाच्या प्रत्येक समारंभात ती दिसली.
जान्हवीने सूरजच्या लग्नात निळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. तिच्या सौंदर्यावर चाहते घायाळ झाले आहेत. लग्नात ती खूप आनंदी दिसत आहे.
सूरजच्या साखरपुड्यासाठी जान्हवीने महाराष्ट्रीयन लूक केला होता. तिने लाल आणि गोल्डन रंगाची नऊवारी साडी नेसली होती. केसात गजरा, गोल्डन ज्वेलरी, सुंदर मेकअपने तिने हा लूक पूर्ण केला.
पिवळ्या रंगाची सुंदर साडी जान्हवीने सूरजच्या हळदी समारंभात नेसली होती. मोकळे केस, मिनिमल ज्वेलरीमध्ये तिचे सौंदर्य खुलले होते. जान्हवीने हळदीत डिपी दादा, सूरजसोबत भन्नाट डान्स केला.
जान्हवी आणि सूरजने लग्जरी कारमधून एन्ट्री घेतली. तसेच 'झापुक झुपूक' या सूरजच्या गाण्यावर जान्हवी बेभान होऊन थिरकली.
'बिग बॉस मराठी 5'मध्ये जान्हवी आणि सूरजचे चांगले नाते तयार झाले. 'बिग बॉस मराठी 5'मुळे जान्हवी किल्लेकरला किलर गर्ल म्हणून ओळखले जाते.
जान्हवीने सूरजला लग्नाची खास भेट म्हणून सोन्याची अंगठी दिली. सूरज आणि जान्हवीच्या अनोख्या बॉन्डिंगची इंटरनेटवर तुफान चर्चा पाहायला मिळत आहे.