Akshaye Khanna : 'धुरंधर'च्या यशानंतर अक्षय खन्ना पोहचला अलिबागला; घराची केली वास्तुशांती, VIDEO होताय व्हायरल

Dhurandhar Star Akshaye Khanna : 'धुरंधर' चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता अक्षय खन्ना अलिबागला पोहचला. अलिबागमधील बंगल्यात त्याने वास्तुशांती केली.
Dhurandhar Star Akshaye Khanna
Akshaye Khannasaam tv
Published On
Summary

'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

'धुरंधर'मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

'धुरंधर'च्या यशानंतर अक्षय खन्नाने अलिबागमधील बंगल्यात वास्तुशांती केली.

'धुरंधर' चित्रपटाने 12 दिवसांत 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपट पाहून आल्यावर प्रेक्षक अक्षय खन्नाच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. 'धुरंधर' हा दिग्दर्शक आदित्य धरचा चित्रपट आहे. 'छावा'नंतर अक्षय खन्नाने 'धुरंधर' गाजवला आहे. 'धुरंधर'च्या यशानंतर अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) अलिबागमध्ये निवांत वेळ घालवत आहे.

सोशल मीडियावर अक्षय खन्नाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अक्षय खन्ना आपल्या अलिबागमधील बंगल्यात वास्तुशांती हवन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शिवम म्हात्रे नावाच्या एका पुजाऱ्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अक्षय खन्ना तीन पुजाऱ्यांसोबत विधींमध्ये सहभागी होताना दिसत आहे. त्याने पांढरा शर्ट आणि निळी डेनिम पॅन्ट असा लूक केला आहे.

व्हिडीओ शेअर केलेल्या पुजाऱ्यांनी व्हिडीओला एक खास कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की,"अभिनेता अक्षय खन्ना यांच्या घरी विधीवत आणि भक्तिभावाने पूजन करण्याचा सौभाग्ययोग लाभला. शांत स्वभाव, साधेपणा आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असे व्यक्तिमत्त्व अनुभवायला मिळाले.चित्रपटसृष्टीत अभिनयाचा 'क्लास' म्हणजे अक्षय खन्ना. छावा या ऐतिहासिक चित्रपटातून सशक्त आणि प्रभावी भूमिका साकारत त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर धुरंधर सारख्या चित्रपटात दिसणारी त्यांची धारदार व्यक्तिरेखा, दृश्यम 2 मधील संयत पण अत्यंत ताकदवान अभिनय आणि Section 375 मधील गंभीर, वास्तवदर्शी भूमिका - प्रत्येक चित्रपटातून त्यांनी अभिनयाची वेगळी उंची गाठली आहे. निवडक भूमिका, आशयघन सिनेमे आणि अभिनयातील प्रगल्भता यामुळे अक्षय खन्ना आजही प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करून आहेत."

अक्षय खन्नाच्या या व्हिडीओवर प्रेक्षकांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'धुरंधर' चित्रपटात अक्षय खन्नाने 'रहमान डकैत' याची भूमिका साकारली. चित्रपटातील अक्षय खन्नाचे FA9LA गाणे सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. 2025 अक्षय खन्नासाठी खूपच यशस्वी ठरले आहे.

Dhurandhar Star Akshaye Khanna
Riteish Deshmukh : "लवकरच येत आहोत..." रितेश भाऊंच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, रिलीज डेट काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com