अक्षय खन्ना अजूनही सिंगल; पण कपूर खानदानच्या 'या' अभिनेत्रीशी ठरणार होतं लग्न, मोडलं कसं?

Akshaye Khanna and Karisma Kapoor Story: अक्षय खन्नाचे नाव कपूर घराण्यातील अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत जोडलं गेलं होतं. नंतर लग्नापर्यंत बोलणी झाली नसल्याची माहिती.
Akshaye Khanna and Karisma Kapoor Story
Akshaye Khanna and Karisma Kapoor StorySaam
Published On

२०२५ हे वर्ष अभिनेता अक्षय खन्नासाठी धमाकेदार ठरला. एकापाठोपाठ एक ब्लॉकबस्टर चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. नुकताच त्याचा धुरंधर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. या चित्रपटात FA9LA या गाण्यावर त्याने २५ सेकंद नृत्य केले. या नृत्याचा छोटा भाग सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, एकेकाळी त्याचं नाव कपूर कुटुंबातील सुंदरीशी जोडलं गेलं होतं.

खरंतर अक्षय खन्ना हा अजूनही सिंगल आहे. 'कुणाची जबाबदारी मी घेऊ शकत नाही', असं म्हणत त्याने लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं. दरम्यान, त्याचं नाव अभिनेत्री करिश्मा कपूरशी जोडलं गेलं होतं. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, अजय देवगणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करिश्माची मैत्री अक्षय खन्नासोबत झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. रिपोर्टनुसार, करिश्मा कपूर अक्षय खन्नाच्या प्रेमात पडली.

Akshaye Khanna and Karisma Kapoor Story
५१ वर्षीय नराधमाची मुलीच्या मैत्रिणींवर वाईट नजर; ३ मुलींच्या अंगावरून हात फिरवला अन्...जाब विचारताच नातेवाईकावर हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, रणधीर कपूर यांनी त्यांच्या प्रेमसंबंधाला मान्यता दिली होती. दोघांनी एकमेकांशी लग्न करावे, अशी इच्छा होती. रणधीर यांनी अक्षयचे वडील विनोद खन्ना यांच्याकडे हा प्रस्ताव ठेवला होता. रणधीर या नात्यावर खूश होते. मात्र, करिश्माची आई बबिता त्यावर नाराज होती. कारण त्यावेळी करिश्मा तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर होती. परिणामी हे नातं तुटलं.

Akshaye Khanna and Karisma Kapoor Story
शरद पवारांचा ८५ वा वाढदिवस, अजित पवारांकडून शुभेच्छा; पाहा VIDEO

अक्षय खन्ना कधीही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलला नाही. किंवा कधीही करिश्मा कपूरचा उल्लेख केला नाही. दरम्यान, अक्षय खन्नासोबत झालेल्या ब्रेकअपनंतर अभिनेत्रीनं बिझनेसमॅन संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली. मात्र, काही वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. सध्या करिश्मा एकटी जीवन जगत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com