नवरा लटकलेला, तर पत्नी अन् ३ मुलांचे मृतदेह खाटेवर; हृदयाचा थरकाप उडवणारी घटना

UP locked house mystery death incident forensic updates : उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह घरात आढळल्याने खळबळ उडाली. नवरा फासावर लटकलेला तर पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह खाटेवर सापडले.
Akola Crime
Akola CrimeSaam tv
Published On

family death case husband hanging wife kids dead full details : शुक्रवारी सकाळी उत्तर प्रदेशमध्ये हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. घरात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळले आहे. श्रावस्तीमधील लियाकत गावात ही खळबळजनक घटना घडली. नवऱ्याचा मृतदेह फासावर लटकलेला आढळला, तर पत्नी अन् ३ मुलांचा मृतदेह घरातील बाजेवर दिसला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

लियाकतमध्ये ही घटना समोर येताच एकच शोककळा पसरली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. हत्या आहे की आत्महत्या? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. कुटुंबाने टोकाचे पाऊल का उचलले? याची चर्चा गावात सुरू आहे. पोलिसांकडून मृत कुटुंबियांच्या शेजाऱ्यांसोबत चौकशी करण्यात आली आहे. अद्याप पोलिसांना या घटनेचं मूळ कारण समजलेले नाही. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.

Akola Crime
Jalna Murder: वहिनीच्या प्रेमात भावाची कुऱ्हाडीने हत्या केली, मृतदेह गोणीत भरून तलावात फेकला, जालना हादरलं

स्थानिकांनी पोलिसांना की, मृत कुटुंबियांचे घराचा दरवाजा आतून बंध होता, त्यामुळे ही परिस्थिती आणखीच संशयास्पद झाली. पाहुण्यांनी आणि शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला. पण आतील दृश्य पाहिल्यानंतर सर्वांच्याच पायाखालील जमीन सरकली. नवऱ्याचा मृतदेह लटकलेला दिसला तर बायको आणि तीन मुलांचे मृतदेह बेडवर आढळून आले. शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर लियाकतमध्ये एकच शोककळा पसरली.

Akola Crime
Bihar Election Result : बिहारमध्ये सत्ता कुणाकडे? पहिला कौल भाजपच्या बाजूने, एनडीएची मोठी आघाडी

लियाकतमधील शमसुल हक यांचा मुलगा रोज अली (३२) याचा मृतदेह बंद खोलीत फासावर लटकलेला आढळला. त्याच्यासोबत त्याची पत्नी शहनाज (३०), मुलगी तबस्सुम (६), मुईन अली (१.५ वर्ष), आणि गुलनाज (४) यांचे मृतदेह घरात खाटेवर पडलेले आढळले. दरवाजा आतून बंद होता. संशयावरून दरवाजा तोडला असता सर्वांचे मृतदेह आत आढळले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी पंचनामा तयार केला आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. दरम्यान, फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलिसांना अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Akola Crime
Gold Rate Today : सोन्याच्या भावात अचानक मोठी वाढ, प्रति तोळ्याला 'इतकी' किंमत; चांदी ३ दिवसात १५००० हजारांनी वाढली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com