

बिहार निवडणुकीची पोस्टल बॅलेट मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू झाली.
सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला मोठी आघाडी मिळाली
तारापूरमधून सम्राट चौधरी पुढे आहेत.
राघवपूरमधून तेजस्वी यादव आघाडीवर
Bihar assembly election early trends BJP RJD live : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. पहिला कल भाजपच्या बाजूने लागला आहे. एनडीचे उमेदवार सम्राट चौधरी पहिल्या कलांमध्ये आघाडीवर आहे. ते तारापूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. बिहारमध्ये सकाळी ८ वाजता पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीला सुरूवात झाली. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला मोठी आघाडी मिळाल्याचे दिसतेय. दरम्यान, सुरूवातीच्या कलांमध्ये एनडीला २५ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर महागठबंधनला ११ जागांवर आघाडीवर आहे.
गया टाऊनमध्ये भाजपचे उमेदवार प्रेम कुमार आघाडीवर
एकमा मतदारसंघातून आरजेडी आघाडीवर
राघवपूरमधून तेजस्वी यादव आघाडीवर
बांकीमधून भाजपला आघाडी मिळाली आहे.
अलीनगरमधून भाजप मैथीली ठाकूर आघाडीवर आहे.
तारापूरमधूल सम्राट चौधरी आघाडीवर आहेत.
मऊआमधून तेज प्रताप यादव पिछाडीवर
मकोमातून आनंत सिंह पिछाडीवर
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली आहे. प्रथम पोस्टल मतपत्रिका मोजल्या जात आहेत, त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी होईल. २४३ मतदारसंघांमध्ये बहुमतासाठी १२२ जागांची आवश्यकता आहे. मतदान मोजणीसाठी प्रशासनाने सर्व जिल्ह्यांमध्ये आवश्यक सुरक्षा व्यवस्था केली आहे. निवडणूक आयोगाने देखील सर्व आवश्यक तयारी केली आहे.
बिहारची सत्ता कुणाकडे जाणार? हे थोड्याच वेळात निश्चित होणार आहे. बिहारच्या मैदानात एनडीए आणि महाआघाडी यांच्यामध्ये थेट लढथ होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात चुरशीची लढत होत आहे. राज्यातील २४३ जागांसाठी दोन टप्प्यात झालेल्या मतांची मोजणी ४६ मतदान केंद्रांवर होत आहे. नितीश कुमार यांनी उत्साहाने विजयाचा विश्वास व्यक्त केला तर तेजस्वी यादव यांनीही १८ नोव्हेंबर रोजी शपथ घेण्याचा दावा केला आहे. एक्झिट पोलनुसार, एनडीएला महिला, ओबीसी आणि ईबीसींचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे. नितीश कुमार सत्ता टिकवून ठेवतील की तेजस्वी यादव बिहारच्या चाव्या आपल्याकडे घेतील, याचा निर्णय थोड्याच वेळात होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.