Gold Rate Today : सोन्याच्या भावात अचानक मोठी वाढ, प्रति तोळ्याला 'इतकी' किंमत; चांदी ३ दिवसात १५००० हजारांनी वाढली

Gold price today 13 November 2025 India city-wise list : देशात पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर २,२९० रुपयांनी वाढला असून तीन दिवसांत चांदी १५,००० रुपयांनी महागली आहे. लग्नसराईत ग्राहकांवर आर्थिक ताण वाढला आहे.
Gold Rate
Gold prices saam tv
Published On
Summary
  • देशभरात सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाली.

  • मागील तीन दिवसांत चांदीच्या दरात तब्बल ₹१५,००० ची वाढ झाली.

  • एमसीएक्सवरही सोनं ₹१,२७,०५४ प्रति १० ग्रॅम तर चांदी ₹१,६५,००० पर्यंत पोहोचली.

  • लग्नसराईमुळे मागणी वाढल्याने सोनं-चांदी पुन्हा झळाळलं.

Gold Price Today; 13 Nov 2025 Gold Rates : गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांजीच्या दरात पुन्हा एकदा चढउतार पाहायला मिळत आहे. लग्नसराई सुरू होताच सोने, चांदीला पुन्हा झळाळी आली आहे. गेल्या चोवीस तासांत सोन्याच्या भावात प्रती दहा ग्रॅमला २२९० रूपयांनी वाढ झाली आहे. तर मागील ३ दिवसांत चांदीच्या दरात १५००० रूपयांनी वाढ नोंदवली गेली. डॉलरच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे सोन्याचे दर वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. जागतिक बाजरासोबत देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. (Gold Price Surges Sharply Across India; Silver Rates Soar Amid Wedding Season)

दिवाळीदरम्यान सोने-चांदीच्या भावात मोठी तेजी आली होती. मात्र, ग्राहकांचा न मिळालेला प्रतिसाद पाहता सोने-चांदीच्या भावात घसरण झाली होती. मात्र आता पुन्हा सोने-चांदीच्या भावात वाढ होणे सुरू झाले. तुळसी विवाहानंतर लग्नसोहळ्यांना सुरुवात झाली आहे. लग्नसराईत सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, भाववाढीने लग्न असलेल्या घरांचे बजेट कोलमडले आहे.

Gold Rate
Train Accident : मुंबईहून घराकडे निघाले, कसारा घाटात मृत्यूने गाठले, रेल्वेतून पडून काँग्रेस नेत्याचं निधन

MCX Gold Price Today + MCX Silver Price Today

एमसीएक्सवरही सोनं आणि चांदीच्या भावात वाढ नोंदवण्यात आली आहे. गुरूवारी सराफा बाजार उघडताच सोन्यामध्ये वायदा कॉन्ट्रैक्टमध्ये ५०० रूपयांची वाढ होऊन 1,27,054 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. चांदीचे दर तीन हजारांनी वाढून १६५००० पर्यंत पोहचले आहे.

Gold Rate
Bus Crash: प्रवासी बस २०० मीटर दरीत कोसळली, ३७ जणांचा मृत्यू, २४ जखमी; पेरूमध्ये भयंकर अपघात

देशातील आजचा सोन्याचा दर किती ? Gold Price In India Today

देशात सोन्याच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, जळगावपासून दिल्ली, चेन्नई आणि कोलकात्यापर्यंत सोन्याच्या दरात गुरूवार वाढ झाली. बुधवारच्या तुलनेत सोन्यामध्ये वाढ नोंदवण्या आली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 12,780 रुपये आहे. बुधवारी ही किंमत 12,551 रुपये इतकी होती. म्हणजेच, आज सोनं प्रति ग्रॅम 229 रुपये वाढले आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प११५०५ वरून वाढून ११७१५ वर पोहचले आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत १७२ रूपयांनी वाढून प्रति ग्रॅम 9,585 रुपये झाले आहे.

Gold Rate
मुंबईकरांसाठी गुड न्यूज! २ तासांचा प्रवास फक्त १० मिनिटात, ३९०० कोटींचा प्रोजेक्ट, वाचा सरकारचा मास्टर प्लॅन!

बुधवारच्या तुलनेत आज २४ कॅरेट सोनं प्रति तोळा २२९० रूपयांनी वाढले आहे. आज सराफा बाजार उघडताच किंमत १२७८०० रूपयांवर पोहचलेय. बुधवारी बाजार बंद झाला तेव्हा किंमत १२५५१० रूपये इतकी झाली. २२ कॅरेट सोन्याची किंमत २१०० रूपयांनी वाढून ११७१५० रूपये प्रति तोळा इतकी झाली. १८ कॅरेट सोन्याची किंमत ९५८५० इतकी झाली आहे. यामध्ये १७२० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली.

Gold Rate
Radiance Hotel Delhi : स्फोटाच्या आवाजाने दिल्ली पुन्हा हादरली, महिपालपूर भागात स्फोटसदृशय आवाज

देशात चांदीचे दर किती आहेत? (Silver Price In India)

बुधवारच्या तुलनेत चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. आज देशातील चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम ₹१७२,००० इतका आहे. म्हणजेच मागील चांदीच्या किंमतीत प्रति किलोग्रॅम ₹१०,००० ची वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांत चांदीच्या किमतीत १५,००० ची वाढ झाली आहे.

Gold Rate
Delhi Car Blast : उमरने कारसह स्वत:ला उडवले, दिल्ली ब्लास्टचा न पाहिलेला व्हिडिओ समोर, अयोध्याही होतं दहशतवाद्याचे टार्गेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com