मुंबईकरांसाठी गुड न्यूज! २ तासांचा प्रवास फक्त १० मिनिटात, ३९०० कोटींचा प्रोजेक्ट, वाचा सरकारचा मास्टर प्लॅन!

Madh Versova link bridge to cut travel time between Malad and Andheri : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! मढ-वर्सोवा लिंक ब्रिज प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. ३९०० कोटींच्या या प्रकल्पामुळे दोन तासांचा प्रवास फक्त १० मिनिटांत होणार आहे.
Madh-Versova Link Bridge
Madh-Versova Link Bridge AI
Published On
Summary
  • मढ-वर्सोवा लिंक ब्रिज प्रकल्पाला पर्यावरण आणि वन विभागाकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे.

  • या प्रकल्पावर ३९०० कोटी रुपयांचा खर्च येणार असून दोन महिन्यांत काम सुरू होणार आहे.

  • ब्रिज पूर्ण झाल्यानंतर दोन तासांचा प्रवास फक्त १० ते १५ मिनिटांत होणार आहे.

  • २ किमी लांबीचा हा केबल-स्टेड ब्रिज बीएमसीकडून उभारला जाणार आहे

Madh-Versova Link Bridge : मुंबईकरांना दिलासा देणारे वृत्त समोर आलेय. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणारा मढ आणि वर्स्वोबा यादरम्यानच्या खाडी पूलाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पर्यावरण आणि वन विभागाकडून अंतिम मंजूरी मिळाली असून दोन महिन्यात कामाला सुरूवात होईल. मालाडचा मढ आणि अंधेरीचा वर्सोवा यादरम्यान प्रवासासाठी दोन तासांचा वेळ लागतो. वाहतूक कोंडी असेल तर यामध्ये आणखी भर पडते. पण २२ किमीच्या या मार्गावर आता खाडी पूल तयार होणार आहे. त्यानंतर हे अंतर फक्त १० ते १५ मिनिटांवर येणार आहे. वर्सोवा आणि मढ या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आता या मार्गावर ३९०० कोटींचा प्रोजेक्टस सरकारकडून हातात घेण्यात आला आहे.

मढ आणि वर्सोवा हा २२ किमीचा प्रवास करण्यासाठी दोन तास लागतात. पण वाहतूककोंडी असेल तर या प्रवासाचा वेळ आणखी वाढतो. पण खाडीवर ब्रिज तयार झाल्यास हा प्रवास फक्त १० मिनिटात पूर्ण होणार आहे. केबल स्टेड ब्रिज बांधण्यात येणार आहे. यामध्ये डेक केबलद्वारे सहारा देण्यात येईल. हा ब्रिज २ किमी लांबीचा असेल. वर्सोवा खाडीवर हा ब्रिज तयार करण्यात येणार आहे. बीएमसीकडून हा ब्रिज बांधण्यात येत आहे.

Madh-Versova Link Bridge
Ajit Pawar : पक्षाने आम्हाला कोललं तर... पुणे जिल्हाध्यक्षांचा अजित पवारांना इशारा, इंदापूरमध्ये नेमकं काय घडतेय?

वर्सोवा आणि मढ या ठिकाणी सर्वात वेग प्रवास सध्या जेटी, बोटद्वारे केला जातो. या प्रवासासाठी फक्त ५ मिनिटांचा वेळ लागतो. तर १० ते १५ रूपये खर्च करावे लागतात. पण जर बाईक असेल तर खर्च आणखी वाढतो. ही बोट चारचाकी वाहनांसाठी नाही. त्याशिवाय पावसाळ्यात बोटसेवा बंद असते. वर्सोवा आणि मढ या मार्गावार रस्तेमार्गे ९० ते १२० मिनिटांचा कालावधी लागतो.

Madh-Versova Link Bridge
Delhi Car Blast : उमरने कारसह स्वत:ला उडवले, दिल्ली ब्लास्टचा न पाहिलेला व्हिडिओ समोर, अयोध्याही होतं दहशतवाद्याचे टार्गेट

BMC कडून या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) कडून फेब्रुवारी २०२३ मध्ये याला परवानगी मिळाली. कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) ची मंजुरी आणि कंत्राटदाराची नियुक्ती देखील मिळाली आहे. या ब्रिजसाठी काही खारफुटीची झाडे तोडणे गरजेचे आहे. यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून मंजुरी प्रलंबित होती. आता सरकारला या कामासाठी मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे लवकरच कामाला सुरूवात होणार आहे. २०२६ मध्ये या कामाला सुरूवात राहण्याची शक्यता आहे. हा पूल तीन वर्षांत पूर्ण करण्याचे प्लान सरकारचा आहे.

Madh-Versova Link Bridge
Borivali crime : बोरीवली हादरली! कामावर जाताना, नराधमाने वाटेतच डाव साधला, पूलाखाली ओडले अन्....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com