

दिल्लीत कार स्फोटात दहशतवादी उमरचा मृत्यू झाल्याचे डीएनए अहवालात स्पष्ट झाले.
स्फोटाचा न पाहिलेला व्हिडिओ समोर आला असून, उमर कारमध्येच होता हे दिसत आहे.
अयोध्याही या दहशतवादी कटचा पुढचा टार्गेट होता.
पोलिस आता दोन संशयित कारचा शोध घेत आहेत
Delhi Red Fort Car Blast : राजधानी दिल्लीमधील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार ब्लास्ट प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोमवारी संध्याकाळी झालेल्या कारचा स्फोट झाला दहशतवादी डॉ. उमर उपस्थित होता. उमर याने स्वतला कारसह उडवून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. डीएनए चाचणीमुळे ही माहिती उघड झाली आहे. धक्कादायक म्हणजे, या कार ब्लास्टचा कधी न पाहिलेला व्हिडिओही समोर आला आहे. वाहतूककोंडीत कार होती, त्यावेळी हा बॉम्बस्फोट झाल्याचे व्हिडिओत दिसतेय. या आत्मघाती हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा जास्त जखमी आहेत.
दिल्लीमधील कार ब्लास्टममध्ये उमर याचा मृत्यू झाला की नाही? याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. दिल्ली पोलीस आणि तपास यंत्रणांकडून उमर याच्या आईला पुलवामामधू ताब्यात घेतले अन् डीएनए चाचणी करण्यात आली. लाल किल्ल्याजवळ झालेल्या मृतदेहापैकी एक उमर याचा असल्याचे उघड झाले. उमरने कारमध्ये झालेल्या स्फोटात स्वतःला उडवून घेतले होतं, हे स्पष्ट झालेय.
दिल्लीमध्ये झालेला कार ब्लास्ट हा दहशतवादी कट असल्याचे उघड झाले आहे. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून तसा तपास केला जात आहे. उमर उन नबी हा बॉम्बर असल्याचे निष्पन्न झाले. तुर्की येथील हँडलरशी जोडलेल्या या मॉड्यूलने अयोध्यालाही लक्ष्य केल्याचे तपासातून समोर आले आहे. तपास यंत्रणांकडून त्या दुसऱ्या दोन कारचा शोध घेतला जात आहे. त्याशिवाय या कटात सहभागी असलेल्यांचाही शोध घेतला जातोय.
राजधानी दिल्लीशिवाय अयोध्याही दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती, असे तपासातून समोर आले आहे. २५ नोव्हेंबर रोजी राम मंदिरावर भगवा ध्वज फडकवण्याच्या वेळी एक प्रयत्न करण्यात आला होता, असे सुरक्षा यंत्रणेतील एका सूत्राने सांगितले. संशयितांनी अमोनियम नायट्रेट आणि आरडीएक्स यांचे मिश्रण वापरण्याचा प्लान आखला होता.
भारतामधील दहशतवादी हल्याचा कट २०२२ मध्ये तुर्कीमध्ये रचण्यात आला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, उमर त्याच्या तुर्कीच्या हँडलरच्या सूचनांनुसार काम करत होता. त्याचे टोपणनाव उकासा असे होते.
दिल्ली ब्लास्ट घडवलेल्या उमर नबी आणि त्याच्या जोडीदाराकडून देशात मोठा दहशतवादी कट रचला होता. त्यासाठी ३ कार घेतल्या होत्या, हे तपासात समोर आले आहे. वाहनांमध्ये बॉम्बस्फोट करायचा अन् असॉल्ट रायफलने गोळीबार करण्याची योजना दहशतवाद्यांनी आखली होती. त्यासाठी आय२०, एक लाल फोर्ड इकोस्पोर्ट आणि एक ब्रेझा अशा तीन कार खरेदी केल्या होत्या असे तपासात समोर आले आहे.
तपास यंत्रणांकडून आता दोन कारचा शोध घेतला जात आहे. दोन कारसाठी पोलिसांकडून सूचना जारी करण्यात आली आहे. त्या कारमध्ये आणखी स्फोटके असू शकतात, असा अंदाज वर्तवला जातयो. या सर्व कार उमर याने खरेदी केल्याचेही पोलिसांच्या तपासात उघड झालेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.