छत्रपती संभाजीनगर–पुणे महामार्गाचा नकाशा प्रसिद्ध होण्याआधीच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या भागातील जमिनींचे भाव वाढले असून अनेक ब्रोकर आणि व्यापारी सक्रिय झाले आहेत.
शेतकऱ्यांना आपल्या शेतीतून महामार्ग जातोय याची माहिती नाही, त्यामुळे फसवणुकीचा धोका.
एमएसआयडीसी आणि नॅशनल हायवे विभागाच्या नकाशा लीक प्रकरणावर चौकशीची मागणी वाढली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Pune highway map viral on social media : छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नव्या महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्याआधीच सोशल मीडियावर व्हायरल झालाय. महामार्ग ज्या भागातून जातोय त्या भागातील जमीन खरेदी करण्यासाठी पुणे-मुंबईतील व्यावसायिक आणि शहरातील बड्या श्रीमंतांची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतातून महामार्ग जातोय याची कसलीच माहितीच नाही. आपल्या शेतीला काही पट भाव मिळत असल्याने या भागात रोज अनेक व्यवहार होत आहेत.
व्हायरल होणारा हा नकाशा साम टीव्हीच्या हाती लागला आहे. पण प्रश्न आहे की केवळ तीन विभागाकडे असलेला मॅप व्हायरल कसा झाला. सरकार याची चौकशी करणार का? शेतकऱ्यांचे नुकसान होऊन श्रीमंताला अधिक श्रीमंत करतोय कोण? या भागात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आधीच जमिनीला सोन्याचा भाव आलाय. त्यात पुन्हा शेतकऱ्यांना माहीत नसताना जमिनी घेऊन महामार्गातून कोटी कोटी रुपये कमावण्यासाठी अनेक लोक आता सक्रिय झाले आहेत. एमएसआयडीसीचे सीई रणजित हांडे यांनी हा नकाशा आमचा नकाशा असल्याचं सांगितले आहे. मग सध्या हा नकाशा सोशल मीडियामध्ये वायरल होत असल्याने अनेक ब्रोकर ही या परिसरात जमिनीचे व्यवहार करण्यासाठी सक्रिय झाले आहेत.
कुठल्याही महामार्गाचा नकाशा तयार करायचा असेल त्यासाठी एक एजन्सी नेमली जाते. त्यामुळे सहाजिकच हा नकाशात एजन्सीकडे असतो. नकाशा तयार झाल्यानंतर तो सदरील विभागाकडे दिला जातो त्यामुळे नॅशनल हायवे विभागाकडे हा नकाशा जातो..
एम एस आय डी सी या विभागाकडे देखील नकाशा जमा केला जातो. छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नव्या महामार्गाचा नकाशा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलेय.
पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांमध्ये महामार्ग तयार होणार आहे. तीन टप्प्यात याचे काम पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी निविदा निघाली आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर फक्त ३ तासात पूर्ण होईल, असा दावा केला जातोय. सध्या या मार्गावर ८ ते १० तासांचा वेळ लागतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.