Bus Crash: प्रवासी बस २०० मीटर दरीत कोसळली, ३७ जणांचा मृत्यू, २४ जखमी; पेरूमध्ये भयंकर अपघात

Peru Bus Crash: दक्षिण पेरूमध्ये भीषण अपघात! ६० प्रवाशांना घेऊन जाणारी बस २०० मीटर खोल दरीत कोसळली. ३७ जणांचा मृत्यू, २४ जखमी; बचाव पथकाकडून मदतकार्य सुरू.
Peru bus accident
Peru bus accident
Published On
Summary
  • दक्षिण पेरूतील अरेक्विपा भागात ६० प्रवाशांची बस २०० मीटर खोल दरीत कोसळली.

  • अपघातात ३७ जणांचा मृत्यू झाला असून २४ प्रवासी जखमी झाले आहेत.

  • बस आणि पिकअपमध्ये समोरासमोर धडक झाल्याने चालकाचा ताबा सुटला.

  • पोलिस व बचावपथकाने तात्काळ मदतकार्य सुरू केले असून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

37 killed in Peru bus accident in Arequipa region : ६० जणांना घेऊन जाणारी बस पिकअपला धडकला अन् २०० मीटर खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातामध्ये ३७ जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर २४ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे मृताची संख्या वाढू शकते. बुधवारी दक्षिण पेरूमध्ये हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावर एकच खळबळ उडाली.

अरैक्विपामधील अपघाताची माहिती मिळातच पोलीस आणि बचावपथकाने घटनास्थळावर धाव घेत तात्काळ मदकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. महामार्गावरील वाहतूक सुरूळीत करण्यात आले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलिसांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६० प्रवाशांना घेऊन जाणारी बस आणि पिकपची जोरात धडक झाली. या धडकेनंतर चालकाचा ताबा सुटला अन् बस २०० मीटर खोल दरीत कोसळली.

Peru bus accident
दिल्ली स्फोटाचे महाराष्ट्रात कनेक्शन? पुण्यासह राज्यात ATS ची छापेमारी, ४ डॉक्टरांचा पर्दाफाश होणार

दक्षिण पेरूमध्ये बुधवारी झालेला हा अपघात गेल्या काही दिवसातील दक्षिण अमेरिकन देशातील सर्वात घातक अपघातांपैकी एक असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अपघातामध्ये आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २४ जण जखमी झाले आहेत," असे अरेक्विपाचे प्रादेशिक आरोग्य व्यवस्थापक वॉल्टर ओपोर्टो यांनी सांगितले. लामोसास कंपनीद्वारे चालवली जाणारी ही बस कारावेली प्रांतातील चाल शहरातून अरेक्विपाकडे जात होती. त्यावेळी काळाने घाला घातला.

Peru bus accident
भाईचा बर्थडे..! सांगलीत 'मुळशी पॅटर्न', १० जणांसोबत स्टेजवर गेला, गुप्तीने अंगावर केले वार, वाढदिवसाच्या सेलीब्रेशनमध्ये दुहेरी हत्याकांड

प्रवासी बस २०० मीटर खोल दरीत कोसळली

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एका वळणावर पिकअप ट्रकला समोरासमोर धडक दिल्यानंतर बस सुमारे २०० मीटर खोल दरीत कोसळली. अपघाताचे भयानक फोटो समोर आले आहेत. बसचा चक्काचूर झाल्याचे फोटोत दिसत आहे. बचाव पथकाचे कर्मचारी जखमींना स्ट्रेचरवर घेऊन जाताना दिसत आहेत.

Peru bus accident
Pune Sambhajinagar : पुणे-संभाजीनगर महामार्ग नकाशा फुटला, धनदांडग्यांकडून कवडीमोल दरात जमीन खरेदी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com