Ajit Pawar : पक्षाने आम्हाला कोललं तर... पुणे जिल्हाध्यक्षांचा अजित पवारांना इशारा, इंदापूरमध्ये नेमकं काय घडतेय?

Pradeep Garatkar threatens resignation if ignored by Ajit Pawar : इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत संघर्ष पेटला आहे. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना थेट इशारा दिला आहे.
Maharashtra Politics
Ajit Pawar Saam tv
Published On
Summary
  • इंदापूर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी अजित पवार गटात वाद निर्माण झाला आहे.

  • जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्षाने विरोधी निर्णय घेतल्यास राजीनामा देण्याची चेतावणी दिली.

  • गारटकर समर्थकांनी उमेदवार निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

  • “पक्षाने कोललं तर आम्हीही कोलू” असा इशारा दिला.

NCP district president Pradeep Garatkar warns Ajit Pawar over Indapur mayor dispute : पक्षाने आम्हाला कोललं तर आम्ही देखील कोलल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांनी इंदापुरातून दिला आहे. इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदावरून इंदापूरमध्ये ऐन हिवाळ्यात राजकारण तापलं आहे. त्यावरूनच जिल्हाध्यक्ष गारटकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह कृषिमंत्री भरणे यांना थेट इशारा दिलाय.

इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठा पेच तयार झाला आहे. इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घेऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी देण्यास जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर समर्थकांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे. जर पक्षाने गारटकर समर्थक विरोधी भूमिका घेतली तर मात्र इंदापूर मध्ये प्रदीप गारटकर आपल्या पदाचा राजीनामा देऊन पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत या संदर्भात झालेल्या चर्चेनंतर गारटकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत गारटकर यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

Maharashtra Politics
Bus Crash: प्रवासी बस २०० मीटर दरीत कोसळली, ३७ जणांचा मृत्यू, २४ जखमी; पेरूमध्ये भयंकर अपघात

जर पक्षाने आपल्या विरोधी निर्णय घेतला तर स्थानिक आघाडी करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरू, उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघू आणि राजीनामा देऊ, असा इशारा गारटकर यांनी दिला. जर पक्षाने आमचं ऐकलं, योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळावरती आहोत. पक्षाने जर आम्हाला कोललं तर आम्ही सुद्धा पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच इंदापुरातून जिल्हाध्यक्ष गारटकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह इंदापूरचे आमदार राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिलाय.

Maharashtra Politics
Delhi Car Blast : उमरने कारसह स्वत:ला उडवले, दिल्ली ब्लास्टचा न पाहिलेला व्हिडिओ समोर, अयोध्याही होतं दहशतवाद्याचे टार्गेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com