Anurag Dobhal : प्रसिद्ध युट्यूबरने बायकोला केली मारहाण; कानाखाली मारली अन्..., भावाने केला धक्कादायक खुलासा

Youtuber Anurag Dobhal : युट्यूबर अनुराग डोभाल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. आता अनुरागच्या भावाने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Youtuber Anurag Dobhal
Anurag Dobhalsaam tv
Published On
Summary

अनुराग डोभालचा भाऊ कलाम यांनी अनुरागवर खोटे बोलल्याचा आरोप केला.

अनुराग डोभाल आपल्या बायकोला मारहाण करायचा.

अनुरागच्या भावाने त्याच्यावर आरोप करत स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

प्रसिद्ध युट्यूबर आणि 'बिग बॉस 17' फेम अनुराग डोभाल (Anurag Dobhal ) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. 5 मार्च रोजी अनुरागने एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला. त्याने व्हिडीओत आपल्याला कुटुंबाकडून छळ होत असल्याचा आरोप केला. ज्यामुळे त्याची बायको रितिका चौहान घर सोडून निघून गेली. आता या प्रकरणात अनुराग डोभालचा भाऊ कलामने मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे अनुरागच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

आता अनुराग डोभालाचा भाऊ कलाम याने व्हिडिओला उत्तर देत अनुरागवर खोटे बोलल्याचा आरोप केला. कलाम म्हणाला की, युट्यूबर व्ह्यूज मिळवण्यासाठी हे करत आहे. यासंबंधित त्याने अनेक पुरावे शेअर केले आहे. आपल्या मिडिया अकाउंटवर कलामने स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. हा स्क्रीनशॉट अनुराग डोभाल आणि त्याच्या जवळच्या मित्रामधील चॅटचा आहे. ज्यामध्ये त्याने बायको रितिकाला मारहाण केल्याचे कबुल केले.

अनुराग मित्राला बोलतो की, माझ्यात आणि रितिकात भांडण झाले आहे. मी तिला मारले. अनुरागने रितिकाला कानाखाली मारली. त्यानंतर रितिका शांत झाली. रितिका अनुरागच्या मित्राविषयी काहीतरी बोलते जे अनुरागला आवडत नाही, ज्यामुळे तो तिला मारहाण करतो. कलामने पोस्टमध्ये म्हटले की, चाहत्यांनो या सर्वात अडकू नका. अनुराग हे व्ह्यूजसाठी करत आहे. त्याने आमच्या आई-वडीलांवर खोटा खटला दाखल केला आणि जेव्हा तो कायदेशीर रित्या हरला तेव्हा त्याने हा व्हिडिओ पोस्ट केला. त्याच्या अशा वागण्यामुळे रितिका त्याला सोडून गेली.

अनुराग डोभालने शेअर केलेल्या व्हिडीओत तो रडताना दिसत आहे. त्याने सांगितले की, रितिका आणि माझ्या नात्याला घरातील सदस्यांनी कायम विरोध केला. कारण त्यांची जाती वेगवेगळ्या होत्या. सध्या अनुराग डोभालचे प्रकरण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सर्वत्र त्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

Youtuber Anurag Dobhal
Badshah : बादशाह नवीन गाण्यामुळे अडचणीत; FIR दाखल, नेमकं कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com