Youtuber anurag Dobhal: बिग बॉस फेम यूट्युबरने सोशल मीडियावर केली शेवटची पोस्ट; मनोरंजन सृष्टीत खळबळ

Youtuber Anurag Dwivedi: "बिग बॉस" फेम प्रसिद्ध युट्यूबर अनुराग डोभालने अलीकडेच एका व्हिडिओमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने स्पष्ट केले की त्याच्या पालकांकडून आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून त्याला होणाऱ्या छळामुळे तो खूप निराश झाला आहे.
Youtuber Anurag Dwivedi
Youtuber Anurag DwivediSaam tv
Published On

Youtuber Anurag Dwivedi: युट्यूबर आणि 'बिग बॉस १७' फेम अनुराग डोभालने अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. इंस्टाग्रामवर एक पोस्ट केल्यानंतर, अनुरागने दोन तासांचा एक व्हीलॉग रिलीज केला, जो तो त्यांचा शेवटचा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओमध्ये, तो त्याच्या स्वतःच्या कुटुंबावर मानसिक छळ आणि गंभीर छळाचा आरोप करत आहे. अनुराग आणि रितिकाने मे २०२५ मध्ये लग्न केले आणि सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांची पहिली प्रेग्नेंसी जाहीर केली होती.

कौटुंबिक छळ आणि युट्यूब सोडण्याचा निर्णय

व्हिडिओच्या सुरुवातीला, अनुराग रडत होता आणि त्याने घोषणा केली की तो युट्यूब कायमचा सोडत आहे. रडत त्याने त्याच्या मानसिक स्थितीचे वर्णन करताना म्हटले, "गेल्या काही महिन्यांत माझे आयुष्य इतके बदलले आहे की माझ्या आयुष्य असे काही घडेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती." त्याने त्याच्या परिस्थितीसाठी त्याचे पालक, भाऊ कलाम आणि बहीण श्रेया यांना जबाबदार धरले. अनुरागने सांगितले की त्याला वयाच्या १४ व्या वर्षी ब्रेन ट्यूमर झाल्याचे निदान झाले. त्यानंतर, त्याने त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांना तोंड देण्यासाठी ट्यूशन देखील सुरू केले. पण त्याला त्याच्या परिवाराचा सपोर्ट मिळाला नाही.

Youtuber Anurag Dwivedi
Varsha Usgaonkar: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ४७ लाखांचा गंडा! नेमकं काय आहे प्रकरण?

पालकांशी मतभेद

अनुरागने त्याची पत्नी रितिकाच्या लग्नाबद्दल सांगितलेकी हा एक आंतरजातीय विवाह होता, जो त्याच्या कुटुंबाने कधीही स्वीकारला नाही. त्याच्या मते, लग्नाच्या सहा दिवस आधी, त्याच्या पालकांनी लग्नाला येण्यास नकार दिला, यामुळे त्याला संपूर्ण समारंभ एकट्यानेच सांभाळावा लागला. अनुरागने आरोप केला की त्याचा सार्वजनिकरित्या अपमान करण्यात आला आणि त्याला सांगण्यात आले की, ते मला हात जोडून तुमचे पाया पडायला लावतील. माझ्या सर्व नातेवाईकांसमोर मला माफी मागण्यास भाग पाडण्यात आले. माझ्या वडिलांनी आणि आईने माझा इतका छळ केला की ते मला एकजा म्हणाले, 'आम्ही कधी आनंदी राहणार नाही आणि तुम्हाला आनंदी राहू देणार नाही.' त्याने पुढे असा दावा केला की या छळामुळे त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला.

Youtuber Anurag Dwivedi
Janki Bodiwala: 'रोज शरीरावर जखमा व्हायच्या...'; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला शूटिंग दरम्यान घडलेला धक्कादायक प्रकार

फसवणूक आणि मालमत्ता चोरीचे आरोप

अनुरागने त्याचा भाऊ कलाम याच्यावरही गंभीर आरोप केला. त्याने असा दावा केला की त्याच्या भावाने त्याच्या कष्टाने कमावलेली मालमत्ता, पैसे सर्व काही हिरावून घेतले आहे. यामुळे तो खूप डिप्रेशनमध्ये होता, गेल्या पाच दिवसांपासून त्याने काहीही खाल्ले नाही. त्याने व्हिडिओमध्ये काही पुरावे जोडल्याचा दावाही केला.

पत्नी रितिका आणि मुलाला शेवटचा संदेश

व्हिडिओच्या शेवटी, अनुरागने उघड केले की त्याची पत्नी रितिका देखील त्याला सोडून गेली आहे, कारण तिचाही छळ करण्यात आला. त्याने रितिका आणि त्याच्या कुटुंबासाठी लिहिले: "मी गेल्यानंतर, श्रेया, आई आणि बाबा खूप काही बोलतील, पण मी चूकीचा नव्हतो. रितिका, अनेक लोकांनी तुला खोटे बोलले, पण मी नेहमीच तुझ्यावर प्रेम केले आणि तुझ्यासाठी सर्व काही केले. पण तू इतरांवर विश्वास ठेवलास, चुकीचे निर्णय घेतलेस आणि मला सोडून गेलीस. मी माझ्या मुलावर प्रेम करतो आणि तो माझी एकमेव आशा होता. तू माझ्यावर विश्वास ठेवला असतास. तू इतरांवर विश्वास ठेवयला नको पाहिजे होतं. तू माझ्या पाठीशी उभा राहायला पाहिजे होतसं असतास. मी गेल्यानंतर, किमान माझ्या आणि माझ्या मुलासाठी तरी खरं सांग." मी तुला कधीच चुकीचे ठरवू इच्छित नव्हतो, पण मी गेल्यानंतर, कृपया माझ्या सन्मानासाठी लढा.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com