उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये खासगी रुग्णालयात डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या
रुग्ण तपासत असताना अज्ञात हल्लेखोराने अचानक गोळीबार केला
आरोपी गोळीबार करून फरार
अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल
Uttar Pradesh Bijnor Doctor Shot Death उत्तर प्रदेशात एका खासगी दवाखान्यात ४५ वर्षीय डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सदर घटना गुरुवारी संध्याकाळी घडली असून हल्लेखोर गोळीबार करून पळून गेला. घटनेवेळी दवाखान्यात उपलब्ध असलेल्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत डॉक्टरचे नाव डॉ. राजकुमार (वय ४५) असे असून सदर घटना उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात घडली आहे. डॉ. राजकुमार यांचे नगीना येथील धामपूर रोडवर शिवालय हेल्थ केअर नावाचे खासगी रुग्णालय आहे. राजकुमार या परिसरातील नामंकित डॉक्टर होते. त्यांच्या हाताला गुण असल्याने त्यांच्या रुग्णलयात वर्दळ असायची.
नेहमीप्रमाणे राजकुमार यांच्या रुग्णालयात गुरुवारी भरपूर गर्दी होती. सकाळच्या सुमारास ते रुग्णांना तपासत होते आणि त्यांची विचारपूस करत होते. याचदरम्यान एक अनोळखी व्यक्ती राजकुमार यांच्या रुग्णालयात घुसला आणि त्याने त्यांच्यावर धाड धाड गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले आणि मृत पावले.
हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन दुचाकीवर बसून पळ काढला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आणि अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली असून मृत डॉक्टरच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.