Celebrity Health: वाढदिवसाच्या दिवशी प्रसिद्ध दिग्दर्शकाला हार्ट अटॅक? रुग्णालयात दाखल; नेमकं सत्य काय?

Sanjay Leela Bhansali latest news : संजय लीला भन्साळी यांच्या ६३व्या वाढदिवशी हार्ट अटॅक आल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र त्यांच्या टीमने अधिकृत निवेदनाद्वारे ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट केले.
Bhansali 63rd birthday viral news
Sanjay Leela Bhansali heart attack rumorgoogle
Published On

एखाद्याचा जन्म दिवस सगळेच आनंदात आणि उत्साहात साजरा करतात. महाराष्ट्रात वाढदिवसाच्या दिवशी त्या व्यक्तीचे औक्षण केले जाते. मात्र सिनेसृष्टीतले एक प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी अचानक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. त्यांचा बद्दल अनेक अफवा पसरताना दिसत आहेत. ती उफवा म्हणजे त्यांच्या ६३व्या वाढदिवशी त्यांना हार्ट अटॅक आला. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची चर्चा जोरात सुरू होती. मात्र या सर्व बातम्या पूर्णपणे खोट्या आणि आधारहीन असल्याचे स्पष्ट झालं आहे.

भन्साळी यांच्या टीमकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, ''संजय लीला भन्साळी यांच्या रुग्णालयात दाखल होण्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. कृपया अशा अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नका.'' या स्पष्टीकरणानंतर अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

Bhansali 63rd birthday viral news
Bird Death Warning: मृत्यूचे संकेत देतात हे पक्षी; तुम्हालाही दिसत असतील तर व्हा सावध

ही अफवा 'मामाराजी' नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवरून सुरू झाली. त्या पोस्टमध्ये भन्साळी यांना वाढदिवशी हार्ट अटॅक आल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे म्हटले गेले. मात्र या पोस्टला कोणताही अधिकृत पुरावा नव्हता.

भन्साळी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहेत. त्यांनी यापूर्वी दिग्दर्शित केलेली वेब सिरीज Heeramandi प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहीली आहे. आता ते 'लव्ह अँड वॉर' या नव्या चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट , रणबिर कपूर आणि विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

एकूणच, सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहितीची खातरजमा करणे आवश्यक आहे. सध्या संजय लीला भन्साळी पूर्णपणे निरोगी असून त्यांच्या आगामी प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत आहेत.

Bhansali 63rd birthday viral news
Eyebrow Shape Tips: चेहऱ्यानुसार आयब्रोचा शेप कसा निवडावा? सुंदर अन् रेखीव डोळ्यांसाठी खास टिप्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com