Sakshi Sunil Jadhav
प्रत्येक महिलेला अजुनही तिच्या रंगारुपावरुन सुंदर मानलं जातं. अशातच महिला सुंदर दिसण्यासाठी खूप प्रयत्न करतानाही दिसतात.
काहींच्या मते महिला सुंदर दिसण्यासाठी त्यांच्या आयब्रोकडे विशेष लक्ष देतात. रंग कोणताही असल्या तरी त्यावर इतर गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही सुंदर आणि रेखीव दिसू शकता.
प्रत्येक चेहऱ्यावर वेगवेगळी आयब्रो शेप सूट होते. त्यामुळे आधी तुमचा फेसचा शेप ओळखून घ्या. मगच आयब्रो करा.
आर्च असलेली उंच कॉर्नर आयब्रो बनवा. त्यामुळे चेहरा बॅलन्स दिसतो. तुम्ही बारिक असाल तर हा शेप सुंदर दिसेल.
जर तुमचा कतरीना सारखा चेहरा असेल तर हलकी कर्व असलेले आयब्रो शेप ठेवा. ती चेहऱ्याला नैसर्गिक आणि सॉफ्ट लुक देते.
सॉफ्ट किंवा हलका कर्व्ह असलेला आयब्रो शेप तुमच्यावर सुंदर दिसू शकतो.
नेचरल आणि सॉफ्ट कर्व असलेले आयब्रो सर्वात जास्त सुंदर दिसतात.
आयब्रोला शेप देण्याआधी स्पूली ब्रश किंवा बेबी टूथब्रशने केस योग्य दिशेने ब्रश करा. त्याने तुम्हाला तुमचा आकार ओळखता येईल.
लहान आणि पातळ कात्रीचा वापर करुन केस खालपासून वरच्या दिशेने हलके ट्रिम करा. हा एक बेस्ट सिक्रेट पर्याय आहे.