Sakshi Sunil Jadhav
बऱ्याच जणांना पक्षी पाहायला खूप आवडतं. लोक पैसे देऊन पक्षी विकत घेतात. हे पक्षी तुम्हाला दिवसभर प्रसन्नही ठेवतात.
शकुन -अपशकुन या गोष्टींवर अद्याप कोणताही पुरावा किंवा उत्तर सापडलेलं नाही. प्रत्येकजण त्याच्या विचाराने एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो.
ज्योतिषशास्त्रानुसार आणि लोकपरंपरेनुसार निसर्गातल्या काही घटना शुभ-अशुभ संकेत देतात, अशी धारणा आहे. पण याचं ठोस कारण कोणाकडे नाही.
काही पक्षी हे महत्वाचे संकेत देतात. पाहुणे येणार असतील तर कावळा दारासमोर ओरडणं अशा प्रकारचे. पण पुढे आपण मृत्यूची चाहूल देणाऱ्या पक्षांबद्दल जाणून घेणार आहोत.
चीन आणि मध्य अमेरिकेतल्या काही संस्कृतींमध्ये काळ्या रंगाचे फुलपाखरू वाटेत येणं अशुभ मानलं जातं. ते दुःखद बातमीचे संकेत असतात असं समजलं जातं.
घुबड जर घराच्या छतावर बसलं आणि ओरडू लागलं की घरातल्या एखाद्या व्यक्तीवर संकट येऊ शकतं. म्हणूनच अनेकांना याची भीती वाटते.
कावळा जर डोक्यावर एखाद्या हाडाचा तुकडा टाकत असेल किंवा आकाशाकडे तोंड करून कर्कश आवाज करत असेल तर एखादा अपघात होऊ शकतो असं मानलं जातं.
भिंतीवरच्या घड्याळाची सूई अचानक तुटत असेल किंवा अलार्म चुकीच्या वेळी वाजत असेल तर हे कुटुंबासाठी वाईट संकेत मानले जातात.
शुक्र ग्रहाचे ओपल रत्न हे गडद होत असेल तर हे आरोग्य बिघाडण्याचे लक्षण मानलं जातं. मात्र विज्ञानानुसार तापमान-प्रकाशामुळे रंगछटा बदलू शकतात.
लोकपरंपरेचा आदर राखत असताना कोणतीही घटना घडल्यास घाबरू नये. तर्कशुद्ध विचार आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे.